Operation Sindoor : न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या कारवाईने देशाची हिंमत वाढवली, सरकार आणि सैन्याचे अभिनंदन – मोहन भागवत

Operation Sindoor : न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या कारवाईने देशाची हिंमत वाढवली, सरकार आणि सैन्याचे अभिनंदन – मोहन भागवत

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. अशा परिस्थितीत हिंदुस्थान सरकार आणि सैन्यासोबत आपण असल्याचे मोहन भागवत म्हणाले. भागवत यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी हिंदुस्थान सरकार आणि सैन्य दलांचे अभिनंदन केले आहे.

ऑपरेशन सिंदूरसाठी हिंदुस्थान सरकार आणि सैन्य दलांच्या नेतृत्वाचे हार्दिक अभिनंदन. हिंदू पर्यटकांच्या क्रूर हत्याकांडातील पीडित कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या या कारवाईने संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि हिंमत वाढवली आहे. तसेच हिंदुस्थानच्या सीमेवरील धार्मिक स्थळे आणि नागरी वस्त्यांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो आणि या हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो, असे मोहन भागवत म्हणाले.

India Pakistan War पूँछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

या आव्हानात्मक प्रसंगी सरकार आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व माहितीचे पूर्ण पालन करण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व देशवासीयांना करत आहे. यासोबतच या प्रसंगी आपले नागरी कर्तव्य बजावताना सामाजिक एकता आणि सौहार्द बिघडवण्याचे देशविरोधी शक्तींचे कोणतेही षड्यंत्र यशस्वी होऊ देणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले.

Operation Sindoor पार्श्वभूमीवर देशभरामध्ये 26 विमानतळं बंद, दिल्लीमधील 90 उड्डाणे केली रद्द

सर्व देशवासीयांना विनंती आहे की, त्यांनी लष्कर आणि नागरी प्रशासनाला आवश्यकतेनुसार सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार राहवे आणि राष्ट्रीय एकता आणि सुरक्षा राखण्यासाठी सर्व प्रयत्नांना बळकटी देऊन आपल्या देशभक्तीचा परिचय द्यावा, असेही आवाहन मोहन भागवत यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;