India Pakistan War – पाकिस्तानकडून पुन्हा उरी, पूँछमध्ये गोळीबाराला सुरुवात, जम्मूत अनेक भागात ब्लॅकआऊट
पाकिस्तानकडून उरी व पूँछमध्ये पुन्हा नागरी वस्त्यांवर गोळीबार व उखळी तोफांचा मारा करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर जम्मू कश्मीरमधील सीमा भागात सायरन वाजले असून ब्लॅकआऊट करण्यात आला आहे.
#WATCH | Uri, J&K: Gunshots and explosions heard as Pakistan resumes arms and artillery fire along the LOC in Uri sector.
Visuals deferred by unspecified time. pic.twitter.com/7AngrvttIp
— ANI (@ANI) May 9, 2025
बंकरमध्ये आसरा घेण्याचे आवाहन
सीमेलगतच्या भागात विविध ठिकाणी नागरिकांनी बंकरमध्ये आसरा घेतला आहे. घरातून बाहेर पडू नये. सातत्याने सायरन वाजला तरी घाबरून जाऊ नये. तसेच तणावाखाली येऊ नये. कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये असे आवाहन पेंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे. ब्लॅक आऊट झाल्यास तणावाखाली जाऊ नये, गोंधळ करू नये, संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन जम्मू कश्मीरच्या पोलिस महासंचालकांनी कले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List