सैफ अली खान हल्ला प्रकरण- सुटकेसाठी आरोपीचा वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात अर्ज

सैफ अली खान हल्ला प्रकरण- सुटकेसाठी आरोपीचा वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात अर्ज

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरात घुसून चाकूने हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने आज वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. पोलिसांनी केलेली अटक बेकायदा असून सुटका करण्यात यावी अशी मागणी त्याने केली आहे.

आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या शरीफुल याने एप्रिल महिन्यात सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. शुक्रवारी त्याने हा अर्ज मागे घेत वांद्रे दंडाधिकाऱ्यांकडे नव्याने अर्ज केला. आपल्याला अटक करताना योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले गेले नाही. त्यामुळे, आपली अटक बेकायदा ठरवावी आणि आपल्या सुटकेचे आदेश द्यावेत, अशी मागणी शरीफुल याने या दंडाधिकारी न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाने त्याच्या अर्जाची दखल घेऊन त्यावर पोलिसांना 13 मेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आरोपपत्र दाखल केले होते. त्या पार्श्वभूमीवर शरीफुल याने जामिनासाठी अर्ज केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;