आरोग्य मंत्रालय कर्मचारीही कामावर
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुट्टय़ा पुढील आदेश मिळेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. निर्धारित सुट्टय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत. जे अधिकारी सुट्टीवर आहेत त्यांना तत्काळ डय़ुटीवर परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गुजरातमध्ये फटाके फोडण्यावर बंदी
गुजरात सरकारने राज्यात फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे. 15 मेपर्यंत पुठल्याही समारंभात, लग्न सोहळ्यात किंवा पुठल्याही कार्यक्रमात फटाके पह्डू नयेत असे निर्देश गुजरातचे गृहमंत्री हर्श संघवी यांनी एक्सद्वारे दिले आहेत. सर्व विभागांतील आणि कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या सुट्टय़ा तत्काळ रद्द करण्याचे निर्देश जारी केले आहेत. विभाग प्रमुखांच्या मंजुरीविना सुट्टय़ांवर जाऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List