Pahalgam Terror Attack: ‘उद्देश केवळ लोकांना मारणे नव्हता तर…’, सोनाक्षीची लक्षवेधी पोस्ट

Pahalgam Terror Attack:  ‘उद्देश केवळ लोकांना मारणे नव्हता तर…’, सोनाक्षीची लक्षवेधी पोस्ट

Sonakshi Sinha On Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. या हल्ल्याबद्दल सर्वजण शोक व्यक्त करत आहेत. दरम्यान, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने देखील या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. एका राजकारण्याच्या विधानावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

22 एप्रिल रोजी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना हिंदू आणि मुस्लिम असं विचारत हिंदूंवर गोळीबार केला. अनेक सेलिब्रिटींनी यावर संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्र सोनाक्षी सिन्हा हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

सोनाक्षी म्हणाली, ‘हा फक्त आणि फक्त द्वेष पसरवण्याचा कट आहे. दहशतवाद्यांचा उद्देश केवळ लोकांना मारणे नव्हता तर लोकांमध्ये अविश्वास निर्माण करणे देखील होता. त्यांचे उद्दिष्ट हिंदू विरुद्ध मुस्लिमांना उभे करणे आणि समुदायांमध्ये फूट पाडणे आहे.’

हे सुद्धा वाचा – पहलगाम हल्ला, शत्रुघ्न सिन्हा यांच्या वादग्रस्त विधानावर लोकांचा संताप; म्हणाले, ‘यांचा तर जावईच…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘ हा दहशतवाद्यांचा सुनियोजित कट आहे. भारतीय म्हणून शोक करण्याऐवजी, आपल्याला हिंदू म्हणून शोक करण्यास सांगितलं जात आहं. भारतीय म्हणून एकत्र येण्याऐवजी, दहशतवाद्यांनी आपल्याला धर्माच्या आधारावर फूट पाडण्यास प्रवृत्त केलं आहे.’ सध्या सर्वत्र सोनाक्षीची पोस्ट देखील व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

 

सांगायचं झालं तर, शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षी सिन्हा हिने पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावर अद्याप अभिनेत्रीचा पती झहीर इक्बाल याने मौन बाळगलेलं आहे. बॉलिवूडमधील शाहरुख खान, सलमान खान, सोनू सूद, अनुपम खेर, कतरिना कैफ, आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा, अल्लू अर्जुन, दीया मिर्जा यांसारख्या सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया देत संताप आणि दुःख व्यक्त केलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;