महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य, अखेर सिडकोने दाखल केले प्रतिज्ञापत्र

महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य, अखेर सिडकोने दाखल केले प्रतिज्ञापत्र

महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे. कोणाच्या बळावर हे राज्य चालण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असा दावा करणारे प्रतिज्ञापत्र सिडकोने अखेर उच्च न्यायालयात सादर केले.

अवैध बांधकामावर कारवाई होत नसल्याने न्यायालयाने सिडकोवर तीव्र संताप व्यक्त केला होता. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की ताकदीचे याचा खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने सिडकोला दिले होते. तरीही सिडकोने याचे उत्तर दिले नाही. अखेर न्यायालयाने सिडकोच्या प्रमुखांनाच याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी स्वतः प्रतिज्ञापत्र सादर केले. सिडको व सिडकोचे अधिकारी बेकायदा बांधकामांवर नियमाप्रमाणे कारवाई करतात, अशी हमीदेखील प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.

कारवाई केली

यगनेश दोशी व अन्य यांनी ही याचिका केली आहे. त्यांच्या जमिनीत बेकायदा बांधकाम झाले आहे. विनंती करूनही प्रशासन या बांधकामावर कारवाई करत नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याची माहितीही प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सांगलीतील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करणार! पोलिसांकडून आजपासून कोम्बिंग ऑपरेशन सांगलीतील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करणार! पोलिसांकडून आजपासून कोम्बिंग ऑपरेशन
गुन्हेगारांचे कंबरडे मोडून काढण्यासाठी पोलीस दलाकडून आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार शहरासह जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी...
शेतकरी म्हणून घेतलेल्या जमिनींचे खरेदी पत्र रद्द, कोल्हापुरात गांधीनगरमधील व्यापाऱ्यांना तहसीलदारांचा दणका
राहुरीतील बिबट्या अखेर जेरबंद!
नरभक्षक बिबट्याला ठार करा, निंबळक गावासह बायपास चौकात रास्ता रोको
खांडगावात नाकाबंदी; मोटारीतून कोटींची रोकड जप्त, महसूल आणि पोलीस पथकाची संयुक्त कारवाई
रंगू लागली हुरडा पार्टी
मुंबई महापालिकेवर नगरविकास विभागाची कृपादृष्टी, साडेआठ कोटी रुपयांची विशेष तरतूद