पुन्हा 26 ठिकाणी ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये तीन जण होरपळले,जम्मूत स्फोटांचे आवाज

पुन्हा 26 ठिकाणी ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये तीन जण होरपळले,जम्मूत स्फोटांचे आवाज

 पाकिस्तानकडून आजही 26 ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. सायंकाळनंतर पाकिस्तानी सैन्याकडून श्रीनगर विमानतळासह अवंतीपुरा हवाई तळावर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले तर जम्मू-कश्मीरच्या 6 सेक्टर उरी, तंगधार, केरन, मेंढर, नौगाम आणि पूंछ येथे अंदाधुंद फायरिंग केली. त्याचबरोबर पंजाबच्या फिरोजपूरमध्ये नागरी वस्तीवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रs डागली. त्यात एका घराला आग लागून तीनजण होरपळले.

जम्मू आणि दक्षिण कश्मीरमध्ये अनेक ठिकाणी स्पह्टांचे आवाज ऐपू आल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले. संपूर्ण जम्मू आणि कश्मीरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला होता. जम्मू, सांबा आणि पठाणकोट जिह्यातही ड्रोन हल्ले झाले. हे ड्रोन पाडण्यात आल्याचे लष्करी अधिकाऱयांनी सांगितले. तर श्रीनगरमध्ये मशिदीच्या लाऊडस्पीकरवरून नागरिकांना लाईट्स बंद ठेवण्याचे आणि सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उधमपूर आणि नगरोटा येथेही ड्रोन हल्ला झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pune News – काळेवाडीजवळ पीएमपीएमएल बसला आग, पिंपरी चिंचवडमध्ये 12 तासांतील दुसरी घटना Pune News – काळेवाडीजवळ पीएमपीएमएल बसला आग, पिंपरी चिंचवडमध्ये 12 तासांतील दुसरी घटना
पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सायंकाळी...
नौदल गोदीवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, आरोपीला ताब्यात घेत चौकशी सुरू
Delhi Blast – दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या i20 कारच्या मालकाला अटक, उमरसोबत मिळून रचला होता कट
जपानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, 4 किमी उंचीपर्यंत उसळला लाव्हा, अनेक उड्डाणे रद्द
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटात बंडखोरी, तिकीट न मिळाल्याने माजी नगरसेविकाने भरला उमेदवारी अर्ज
निष्पक्ष आणि पारदर्शकतेने निवडणुका झाल्या असत्या तर निकाल वेगळे असते; मायावती यांचा दावा
हे उत्तर कोरिया, चीन, रशियामधील निवडणुकांसारखे… सर्व मते एकाच पक्षाला जातात; बिहार निवडणूक निकालांवर दिग्विजय सिंग यांचं वक्तव्य