India Pakistan War- भ्याड पाकिस्तानने नागरी विमांनाची ढाल बनवली, हिंदुस्थानने उघड केलं पाकचं कारस्थान
‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व घडामोडी जगासमोर परराष्ट्र मंत्रालयाने मांडल्या. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, लष्कराचे कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाचे विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी या परिषदेला संबोधित केले. पत्रकार परिषदेमध्ये यावेळी कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, पाकिस्तानने आपली बेजबाबदार कृत्ये सोडलेली नाहीत. अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, पाकिस्तानने हवाई क्षेत्र अद्याप नागरी विमानांसाठी बंद केलेले नाही. पाकिस्तान या विमानांचा वापर ढाल म्हणून करत आहे. त्यांनी यासंदर्भातील एका विमानासंदर्भातील माहितीही यावेळी दिली.
या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालय, लष्कर आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी 8-9 मे च्या रात्री केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली. कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, सीमेवरील तणावानंतर हिंदुस्थानने नागरी उड्डाणांसाठी सीमेजवळील आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. हिंदुस्थानचे हवाई क्षेत्र अजूनही बंद आहे. त्या म्हणाल्या, पाकिस्तानचे बेजबाबदार वर्तन पुन्हा एकदा समोर आले आहे. 7 मे 2025 च्या रात्री झालेल्या अकारण आणि अयशस्वी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यानंतरही पाकिस्तानने आपले नागरी हवाई क्षेत्र बंद केलेले नाही. पाकिस्तान आपल्या नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून करत आहे, परंतु त्यांना माहिती आहे की, हिंदुस्थानवर केलेल्या हवाई हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर मिळेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List