युद्ध परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार

युद्ध परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार

भारताच्या सीमेवर पाकिस्तानने केलेल्या आगळीकीमुळे युद्धजन्य परिस्थिती ओढवली आहे. भारतातील दहशतवादी कारवायांशी आमचा काही संबंध नाही, हे किती जरी पाकिस्तान सरकारने सांगितले तरी दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला पाकिस्तान सरकारच्या प्रतिनिधींची उपस्थिती यातून सर्व काही स्पष्ट होते, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

युद्ध ही आपली निवड नाही, हे अनेक वेळा देशाच्या पंतप्रधानांसह अनेकांनी स्पष्टपणे सांगितले आहे, पण जर आपल्यावर हल्ला झाला तर आपल्या रक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असते आणि आज तीच खबरदारी घेतली जात आहे. आज आपला देश एका वेगळय़ा स्थितीतून जात आहोत. त्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून एक सशक्त भारत उभा करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे शरद पवार सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

भारताने कधीही दहशतवादी चळवळीला प्रोत्साहन दिलेले नाही. आपल्या देशातील लोक हे शांततेचा पुरस्कार करणारे आहेत. सीमेवर जे काही घडत आहे त्यामागे पाकिस्तानातील सत्ताधारीच आहेत.

सैन्याच्या कामगिरीचा अभिमान
सैन्यदलाची कामगिरी पाहून अभिमान वाटतो. आता सैन्यदल महिलांच्याही हाती आहे. संरक्षण मंत्री असताना संरक्षण खात्यामध्ये नऊ टक्के महिलांची भरती व्हावी असा निर्णय आम्ही घेतला होता. त्याचाच परिणाम म्हणून आज महिला ब्रिगेड लष्करात अत्यंत मानाने उभी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या मुख्य कर्नल सोफिया पुरेशी यांच्या धाडसाचा पवार यांनी उल्लेख केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी दिलं आश्वासन; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी दिलं आश्वासन; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी हिंदुस्थानबाबत आणखी एक मोठा दावा केला आहे. हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असे...
कोकण विभागाच्या उपसंचालक अर्चना गाडेकर-शंभरकर यांचे निधन
Bihar election 2025 – प्रशांत किशोर  यांची निवडणूक रिंगणातून माघार
पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये संघर्ष पेटला, 50 हून अधिक ठार
सरन्यायाधीशांवर बूटफेकीचा प्रयत्न, चर्मकार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 16 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
मलबार हिल विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर