जम्मूमध्ये घुसखोरीचा डाव बीएसएफने उधळला; सात दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मूमध्ये घुसखोरीचा डाव बीएसएफने उधळला; सात दहशतवाद्यांचा खात्मा

भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरून जम्मूत घुसण्याचा सात दहशतवाद्यांचा डाव बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाने उधळून लावला. बीएसएफच्या कारवाईत हे दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाकिस्तानातील एक रेंजर्स चौकी उद्ध्वस्त करण्यात आली.

गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सांबा जिह्यात पाक चौकीवरून गोळीबार होऊ लागला. त्याआडून हिंदुस्थानात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता. पाकिस्तानी रेंजर्स चौकी असलेल्या धांधारवरून हा गोळीबार होत असल्याचे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले. मात्र हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावत किमान सात दहशतवाद्यांना ठार मारले आणि धांधार चौकी उद्ध्वस्त केली.

पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवर पुपवाडा, उरी, आरएसपुरा, बारामुल्लासह अनेक सेक्टर्समध्ये सातत्याने गोळीबार आणि तोफगोळय़ांचा मारा सुरूच आहे. या गोळीबारात नियंत्रण रेषेवरील गावांतील अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 17 निष्पाप हिंदुस्थानींचा बळी गेला असून 50 हून अधिक जखमी झाले आहेत.

बीएसएफने पाक चौकी आणि बंकरची थर्मल इमेजर क्लिप शेअर केली आहे. रेंजर्सची मोठी मशीनगन या ठिकाणी बसविण्यात आली होती.

अनेकांनी घरे सोडली

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे अनेक लोकांनी घरे सोडली. एलओसीजवळील बालाकोट, मेंढर, मनकोट, पृष्णा घाटी, गुलपूर, केरनी आणि पूँछ जिह्यात पाकिस्तानी सैन्याने तोफगोळय़ांचा मारा केला. यात डझनभर घरांचे आणि वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गायी-म्हशीच्या दूधाहून जास्त कॅल्शियम देतो हा एक पदार्थ, हाडांना करतो मजबूत गायी-म्हशीच्या दूधाहून जास्त कॅल्शियम देतो हा एक पदार्थ, हाडांना करतो मजबूत
हाडांच्या मजबूतीसाठी अनेक जण दूधाला प्राधान्य देतात. परंतू दूधाची काही जणांना एलर्जी असते. त्यामुळे दूधाशिवाय देखील असे काही पदार्थ आहेत...
गणपतीपुळे समुद्रात पर्यटक का बुडतात यांचा तांत्रिक बाजूने अभ्यास करा -जिल्हाधिकारी मनुज जिंदल
Ratnagiri Municipal Council Election- नगराध्यक्ष पदाचा एक, नगरसेवक पदाचे दहा अर्ज बाद
Cloudflare Down – एक्स, फेसबुक, चॅटजीपीटीसह अनेक साइट्स डाऊन; नेटकरी त्रस्त
Ratnagiri News – संगमेश्वर येथे राष्ट्रीय महामार्ग दिवसा बंद ठेवण्यास परवानगी नाकारली, पूलाचे गर्डर रात्रीच्या वेळी चढवणार
दोघे एकमेकांची अडवतात आणि जिरवतात! मिंधे गटाच्या नाराजीनाट्यावर अंबादास दानवेंचा टोला
लवकरच यांना फेकून भाजप एकटाच सत्तेत दिसेल, मिंधेंच्या मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावरून वडेट्टीवारांची महायुतीवर टीका