India Pakistan War- तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाची बैठक
हिंदुस्थान पाकिस्तान यांच्यातील चाललेल्या सद्यपरिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच तिन्ही दलाची बैठक बोलवली होती. यावेळी तिन्ही दलाचे प्रमुख बैठकीसाठी उपस्थित होते. पंतप्रधानांना तिन्ही दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधानांना सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेल्या पाककडून वरचेवर हिंदुस्थानवर हल्ले करण्यात येत आहेत. हे हल्ले तिन्ही सैन्याकडून परतवून लावले जात आहेत. असे असले तरी देशाच्या सीमाभागांमध्ये मात्र तणावाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली. एकूणच घडणाऱ्या घटनांचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सध्याच्या वातावरणात देशात सर्व ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. म्हणूनच या घडामोडी पाहता ही बैठकही तितकीच महत्त्वाची मानली जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List