India Pakistan War मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा वाढवली

India Pakistan War मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा वाढवली

सध्याच्या घडीला हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या, तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशामध्ये सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना  हायअलर्ट लागू करण्यात आलेला आहे. ऑपरेशन सिंदूर च्या पाश्वभूमीवर पाकिस्तानी सैन्य हिंदूस्थानच्या नागरी वस्त्यांवर हल्ले चढवत आहे. या हल्ल्यांमध्ये रॉकेट लाँचर्स, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला जात असल्याने, मुंबईच्या किनारपट्टीवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.

हिंदुस्थानी सैन्याने गुरुवारी रात्रभरात पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिला आहे. थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले. हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा वाढवली आहे. समुद्रकिनारी फिरायला आलेल्या, किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना त्वरित समुद्रकिनाऱ्यावरून उठून जाण्यास सांगितले जात आहे. तसेच सर्वांना सुरक्षेचं कारण देऊन समुद्रकिनाऱ्यापासून दूर जाण्यास सांगितलं जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रेगन आणि श्वेताला अव्वल मानांकन रेगन आणि श्वेताला अव्वल मानांकन
खार जिमखाना येथे मंगळवार 15 जुलैपासून खेळल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरीमध्ये रेगन अल्बुकर्क...
युक्रेनशी 50 दिवसांत शांतता करार करा, अन्यथा कठोर निर्बंध लादले जातील; ट्रम्प यांनी रशियाला दिली धमकी
वैवाहिक वादासंबंधी कायद्यांचा वारंवार गैरवापर केला जातोय; मुंबई हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी
वेस्टर्न एक्सप्रेस मार्गावरील सर्विस रोडवर गॅरेज आणि सलून, अतिक्रमण हटवण्यासाठी कधी होणार कारवाई? वरून सरदेसाई यांचा सवाल
कॉफीमध्ये प्रोटीन पावडर मिक्स करून प्यायल्याने झटपट वेटलॉससह आरोग्यास मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे
Himachal Tourist Death – हिमाचलमधील धर्मशाळाजवळ पॅराग्लायडिंग करताना अपघातात, गुजरातमधील पर्यटकाचा मृत्यू
Air India विमान दुर्घटनेनंतर DGCA सतर्क, सर्व बोइंग विमानांमध्ये ‘फ्युएल स्विच लॉक’ तपासणी केली बंधनकारक