झीनत अमान यांची प्रकृती खालावली, रुग्णालयातील फोटो अखेर समोर
एक काळ बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री झीनत अमान यांनी जेव्हा सोशल मीडियावर एन्ट्री केली, तेव्हापासून त्या रोज काहीना काही सोशल मीडियावर पोस्ट करायच्या आणि चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करायच्या. पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर झीनत यांनी एक पोस्ट शेअर केली नव्हती. अखेर त्यांनी पुन्हा सोशल मीडियावर पुन्हा पदार्पण केलं आणि स्वतःच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे.
झीनत अमान यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती दिली आहे. झीनत यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता खुद्द झीनत यांनी रुग्णालयातील तीन फोटो शेअर केले आहेत. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
रुग्णालयातील फोटो शेअर करत झीनत म्हणाल्या, ‘रिकव्हरी रुममधून सर्वांना हॅलो… , मी माझ्या सोशल मीडियाच्या आकांक्षा सोडून दिल्या आहेत असं तुम्हाला वाटलं असेल, पाण यासाठी मी तुम्हाला दोष देणार नाही. शेवटी, माझं प्रोफाइल अलिकडे खूपच शांत होते… पण त्याला काय करणार?’
‘गेल्या काही आठवड्यांपासून, मी कागदपत्रांच्या कामामुळे आलेला थकवा आणि वैद्यकीय प्रक्रियेच्या चिंतेमध्ये अडकली आहे, परंतु मला आता इंस्टाग्रामवर माझी कहाणी सांगत राहण्याची प्रेरणा मिळत आहे. बघा, एखाद्याला जिवंत राहण्याचा आणि स्वतःचं मत मांडण्याचा अर्थ काय आहे याची आठवण करून देण्यासाठी रुग्णालयाच्या उदास, क्लिनिकल थंडीसारखं दुसरं काहीही नाही..’
पुढे झीनत म्हणतात, ‘वैयक्तिक इतिहास, फॅशन, कुत्रे आणि मांजरी आणि वैयक्तिक मते यासह सिनेमाशी संबंधित अधिक चर्चा अपेक्षित आहे. असा एखादा विषय आहे का ज्यावर मी लिहावं असं तुम्हाला वाटतं? त्यावर एक टिप्पणी द्या आणि मी सविस्तर चर्चा करण्यासाठी एक निवडेन…’ अशी विनंती देखील चाहत्यांकडे केली आहे.
अभिनेत्री झीनम अमान यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला. आता वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही त्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. इन्स्टाग्राम विविध पोस्ट लिहित त्या सतत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. या पोस्टद्वारे ते त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अनुभव सांगत असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List