व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ डाळीचे करा सेवन, शरीराला मिळतील अनेक फायदे

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ डाळीचे करा सेवन, शरीराला मिळतील अनेक फायदे

आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांच्या बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांची कमतरता भासू लागली आहे. ज्यात जास्‍त करून व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भासत आहे. व्हिटॅमिन बी 12 हा एक घटक आहे जो आपल्या डीएनए बनवण्यास आणि आपल्या पेशींसाठी ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतो. शरीरात या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा येतो. ही कमतरता विशेषतः शाकाहारी आहार घेत असलेल्या लोकांमध्ये जास्त दिसून येते, कारण व्हिटॅमिन बी 12 प्रामुख्याने मांसाहारी पदार्थांमध्ये आढळते. अशा वेळेस त्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही पूरक आहार तसेच व्हिटॅमिन बी 12 असलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता.

पण तुम्हाला माहिती आहे का की शाकाहारी आहारांमध्ये एक खास डाळ आहे जी या आवश्यक जीवनसत्वाचा समृद्ध स्रोत आहे. आपण ज्या डाळीबद्दल बोलत आहोत ती खाण्यास चविष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. ती डाळ कोणती आहे आणि तुम्ही ती तुमच्या आहारात कशी समाविष्ट करू शकता ते आजच्या लेखात जाणून घेऊयात.

व्हिटॅमिन बी 12 बद्दल एक खास गोष्ट जी फार कमी लोकांना माहिती आहे ती म्हणजे हे व्हिटॅमिन शरीरात स्वतः तयार होत नाही, म्हणून तुम्हाला तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो ज्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 असते.

व्हिटॅमिन बी 12 साठी चणाडाळ आहे फायदेशीर

चणा डाळ ही प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात असते. कारण सर्वात सामान्य पण अत्यंत पौष्टिक डाळींपैकी एक आहे. त्यात प्रथिने, फायबर, लोह आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. पण जेव्हा ही डाळ भिजवली जाते किंवा फर्मेंट केली जाते, जसे की ढोकळा बनवण्यासाठी तेव्हा त्यात काही प्रमाणात व्हिटॅमिन बी12 सारखी संयुगे तयार होतात. जरी ही मात्रा मांसाहारी स्रोतांइतकी नसली तरी, शाकाहारी लोकांसाठी ती एक उत्तम पर्याय असू शकते.

सेवन कसे करावे?

  • तुम्ही चणा डाळची भाजी किंवा त्यापासून पदार्थ तयार करून दिवसातून एकदा खाऊ शकता.
  • तसेच चणा डाळा ऐवजी तुम्ही मोड आलेले चण्यांचा सलाड बनवून सेवन करू शकता.
  • चणा डाळीपासून बनवलेला ढोकळा किंवा चिल्ला सेवन केल्याने शरीरात बी12 वाढवू शकतो.
  • चण्यांचा सूप किंवा डाळ खिचडीमध्ये या डाळीचा समावेश करून सेवन केल्यास तुम्हाला भरपूर पोषण मिळेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हसण्याने खरंच आयुष्य वाढतं? अन् लवकर म्हातारपणही येत नाही? विज्ञान आणि आयुर्वेदाने सांगितलेलं सत्य जाणून आश्चर्य वाटेल हसण्याने खरंच आयुष्य वाढतं? अन् लवकर म्हातारपणही येत नाही? विज्ञान आणि आयुर्वेदाने सांगितलेलं सत्य जाणून आश्चर्य वाटेल
नेहमी हसत राहावं,त्यामुळे मन तर खुश राहतं शिवाय आरोग्यही सुधारत, आयुष्य वाढतं असं आपण अनेकदा ऐकलं असेल. पण खरंच असं...
सकाळी रिकाम्या पोटी दुधासोबत शिळी चपाती खाणे हा या लोकांसाठी लाभदायी
Solapur News – उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, पंढरपूरात चंद्रभागेतील मंदिरांना पाण्याचा वेढा
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ डाळीचे करा सेवन, शरीराला मिळतील अनेक फायदे
सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन
Ratnagiri News – अर्बन बॅंक संशयाच्या भोवऱ्यात, राजापूर शाखेतून 100 कोटींच्या ठेवी काढल्या
भरधाव ट्रकने 10 ते 15 जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू; अनेक वाहनांना धडक