सकाळी रिकाम्या पोटी दुधासोबत शिळी चपाती खाणे हा या लोकांसाठी लाभदायी
जेवण बनवता सहसा प्रत्येकजण जरा जास्तच जेवण बनवतो. जसं की चपात्या किंवा रोट्या या शिल्लक राहतातच. पण हे अनेकांना माहित नसेल की या शिळ्या रोट्या किंवा चपाती खाणे अनेकांना आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे त्या फेकून देण्याऐवजी त्या कशापद्धतीने खाल्ल्या तर त्याचा लाभ कसा घेता येईल हे जाणून घेऊयात. तर सकाळी रिकाम्या पोटी दुधासोबत शिळ्या रोटीचे किंवा चपातीचे सेवन केल्याने नक्कीच त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्याने काय फायदे मिळतात जाणून घेऊयात.
पोट थंड राहते
शिळ्या चपातीमध्ये असे घटक आढळतात जे तुमचे पोट थंड ठेवण्यास मदत करतात. सकाळी दुधासोबत शिळी चपाती सेवन केल्याने पोट शांत राहते आणि अॅसिडिटीपासूनही आराम मिळतो. शिवाय पोटही भरतं.
मधुमेहाच्या रुग्णांना फायदा मिळतो
मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर शिळी चपाती आणि दूध खाणे फार फायदेशीर ठरू शकते. त्याच्या सेवनाने मधुमेहावर नियंत्रण राहण्यास मदत होते. दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्याने शरीराला ऊर्जा तर मिळतेच पण सोबतच साखरेची पातळी देखील अचानक वाढत नाही.
बद्धकोष्ठतेपासून आराम
सकाळी रिकाम्या पोटी दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. त्यात भरपूर फायबर असते जे पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत करू शकते.
वजन नियंत्रित राहते
सकाळी रिकाम्या पोटी दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्याने तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते. ज्यामुळे भूक लागत नाही आणि तुम्ही जास्त खाण्यापासून वाचता. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
मजबूत हाडे
दुधात कॅल्शियम आढळते आणि रोटीमध्येही भरपूर पोषक तत्वे असतात. अशा परिस्थितीत या दोन्हींचे सेवन हाडे मजबूत करण्यास मदत करू शकते.
ऊर्जा मिळते
सकाळी रिकाम्या पोटी दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्याने तुमच्या शरीराला संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा मिळते
या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
> चपाती एक दिवस आधीची शिळी असावी. आणि जर चपातीची चव आंबट लागत असेल किंवा वास येत असेल किंवा कधी कधी चपाती वातावरणामुळे एका दिवसातही खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यावर बुरशी चढली असेल तरी देखील ती चपाती किंवा रोटी खाऊ नये.
> तसेच तुमची डॉक्टरांकडे कोणते उपचार सुरु असतील तर ते नक्कीच सुरु ठेवावेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List