सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे सोमवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयात असतानाच चक्कर आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवले. मात्र हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे ते नातू होत.
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची उत्तम समज आणि सखोल संविधानिक ज्ञान असलेले सिद्धार्थ शिंदे हे मागील अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होते. सोमवारी ते नेहमीप्रमाणे न्यायालयात गेले होते. यावेळी अचानक त्यांना चक्कर आल्यानंतर एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मूळचे नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी असलेले सिद्धार्थ शिंदे यांचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये स्थायिक आहे. सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनाबद्दल न्यायालयीन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. केसेस, निर्णय, न्यायाधीशांचा दृष्टीकोन व कायदेशीरता या सर्वांबाबत अत्यंत सयंत व सोप्या पद्धतीने विश्लेषण करणारे संविधान विश्लेषक वकील आपण गमावून बसलो आहोत, अशी प्रतिक्रिया अॅड. असीम सरोदे यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List