धक्कादायक : देशातील 11 टक्के लोकांना आयुष्यभर कॅन्सरचा धोका, काय आहे कारण ?
Cancer in India : जगभरातील कॅन्सर प्रकरणांवर नजर टाकली तर भारत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चीन आहे. या देशात लोकसंख्या अधिक असल्याने कॅन्सरची प्रकरणे देखील अधिक आढळत आहेत. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरचे ग्लोबोकॅनच्या 2022 च्या डेटानुसार भारतात कॅन्सरचे 14 लाख प्रकरणे समोर आले होते. तर 9 लाख लोकांचा कॅन्सरने मृत्यू झाला आहे. भारतात कॅन्सरची प्रकरणे का जास्त पाहूयात..
कॅन्सरची वाढती प्रकरणांना पाहून गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या संशोधनात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 20 ऑगस्ट रोजी जावा नेटवर्कची अहवाल समोर आला आहे. त्यात भारताच्या दर दहाव्या व्यक्तीला कॅन्सर झाल्याचा अंदाज आहे.म्हणजे लोकसंख्येच्या 11 टक्के लोकांना या जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागत आहे. National Cancer Registry Programme Investigator Group ने हे संशोधन केले आहे.
या अभ्यासात सात लाखहून अधिक कॅन्सर प्रकरणाचे संशोधन केले गेले. यात 2 लाख अशा प्रकरणांचा अभ्यास केला ज्यात मृत्यू झाला आहे. हे आकडे पाहाता आता कॅन्सर केवळ एक समस्या नाही, तर एक मोठ्या प्रमाणात आव्हान बनले आहे.
कोणती राज्ये प्रभावित
मिझोरमची राजधानी आईझोल कॅन्सर बाबत सर्वाधिक प्रभावित आहे. येथे दर एक लाख पुरुषांमध्ये 256 पुरुषांना कॅन्सर आढळला आहे. तर एक लाख महिलांमागे 217 महिलांना कॅन्सर झालेला आहे.
पूर्वोत्तर भारतातील 6 जिल्ह्यात सर्वाधिक कॅन्सरची प्रकरणे आढळली आहेत. याशिवाय काश्मीर खोऱ्यात आणि केरळात देखील कन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. हैदराबाद येथे दर एक लाख महिलांपैकी 154 महिला कॅन्सरच्या रुग्ण आहेत. ब्रेस्ट कॅन्सर आणि ओरल कॅन्सरचे सर्वाधिक प्रकरणे आहेत.
देशाच्या नॉर्थ ईस्टमध्ये दोन प्रकारचे कॅन्सर अधिक आढळत आहेत. पहिला आहे एसोफॅगल कॅन्सर, हा अन्न नलिकेतील कॅन्सर आहे. दुसरा पोटात होणार कॅन्सर. मोठ्या शहरात ब्रेस्च कॅन्सर आणि ओरल कॅन्सरची प्रकरणे अधिक आहेत. तर गावात सर्व्हायकल कॅन्सर अधिक आढळत आहेत.
दिल्लीची स्थिती चिंताजनक
राजधानी दिल्लीत प्रदुषण, बदललेली लाईफस्टाईल आणि खानपानची सवय आणि स्क्रीनिकची कमतरता यामुळे कॅन्सरचे प्रकरण वाढत आहेत. दिल्लीतील युवकांत ब्लड कॅन्सरच्या (Acute Myeloid Leukemia) केस वाढत आहेत.
3,000 नवीन प्रकरणं
अलिकडच्या वर्षात दिल्लीत ब्लड कॅन्सरचे सुमारे 3000 नवीन केस दाखल झाल्या आहेत. 30 ते 40 वयोगटातील लोकांमध्ये यांचे चिंताजनक प्रमाण आहे. कॅन्सर आता वृद्धांना नव्हे तर तुरुणांनाही लक्ष्य करत आहे. प्रदुषणामुळे फुप्फुसाचे कॅन्सरही वाढत आहे.
वाढती लोकसंख्या, वयोवृद्धांची संख्या, खानपान आणि जीवनशैली, प्रदुषण यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. वेळेत निदान न होणे आणि उपचार न झाल्याने हे प्रमाण वाढले आहे. देशात सुमारे 11 टक्के लोकांना जीवनभर कॅन्सरचा धोका होणे क इशारा आहे. जर तुम्ही खानपान, पर्यावरण, निदान आणि उपचार, जीवनशैलीत सुधारणा केली तर या धोक्याला रोखता येऊ शकते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List