साहित्य संघ, पत्रकार संघाच्या मोक्याच्या जागांवर अमराठी बिल्डरांचा डोळा; संजय राऊत यांचा घणाघात
मंगलप्रभात लोढा यांचा आणि साहित्याचा संबंध काय? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच मुंबईतल्या प्रतिष्ठित ज्या मराठी संस्था त्यांच्या मोक्याच्या ठिकाणी अमराठी बिल्डरांचा डोळा आहे असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, लोढा साहित्य संघामध्ये जाऊन मतदान करतात. त्यांचा आणि साहित्याचा संबंध काय? का तो भुखंड पण जातोय आमचा. मुंबईतल्या प्रतिष्ठित ज्या मराठी संस्था आहेत, आणि त्यांच्या जागा मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे बिल्डर आणि राजकीय लॉबी यांचे त्यावर लक्ष आहे. त्यात साहित्य संघ, मुंबई मराठी पत्रकार संघाची आझाद मैदानाची जागा, मुंबई मराठी संग्रहालयाची जागा, शिवाजी मंदिर इथे हे सगळे लोक घुसून गोगलगायीच्या पायाने या जागांवर कब्जा करतील. हे साहित्यिक कधीपासून झाले? ज्यांनी साहित्य संघाची स्थापना केली त्यांच्या नावाने डुप्लिकेट पॅनल उभं केलं. बोगस मतदार निर्माण करून साहित्य संघाची जागा ताब्यात घेत आहात. मराठी माणसाच्या अस्मितेची ती जागा आहे. यासाठीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र येऊन लढावं लागत आहे असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List