उत्तर प्रदेशात भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ, आरोपींनी CCTV फुटेजचे DVR ही पळवले
उत्तर प्रदेशात भाजप नेते आणि माजी ब्लॉक प्रमुख विनोद चौधरी यांची अज्ञात आरोपींनी हत्या केली. बुलंदशहरातील खुर्जा कोतवाली परिसरातील राहत्या घरात चौधरी यांची हत्या करण्यात आली. चौधरी यांची हत्या कुणी आणि कोणत्या कारणातून केली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र चौधरी यांच्या भावाच्या म्हणण्यानुसार जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.
विनोद चौधरी यांची पत्नी आणि मुलं दिल्लीत राहतात. बुलंदशहरमध्ये ते एकटेच राहत होते. सोमवारी सकाळी उशिरापर्यंत चौधरी उठले नव्हते. शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता बेडवर चौधरी यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह दिसला. शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
विनोद चौधरी हे जेवर आणि खुर्जा ब्लॉकचे दोनदा ब्लॉक प्रमुख राहिले आहेत. ते भाजपचे एक सक्रिय नेते होते आणि स्थानिक पातळीवर खूप प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. चौधरी यांच्या हत्येनंतर आरोपींनी सीसीटीव्ही फुटेजचे डीव्हीआर पळवल्याने पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे आव्हान आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List