गुडघ्यांचा काळेपणा काढून टाकण्यासाठी हे आहेत हमखास खात्रीशीर उपाय, वाचा

गुडघ्यांचा काळेपणा काढून टाकण्यासाठी हे आहेत हमखास खात्रीशीर उपाय, वाचा

प्रत्येकाला आपली त्वचा स्वच्छ, चमकदार आणि सुंदर दिसावी असे वाटते. परंतु शरीराचे काही भाग जसे की गुडघे, कोपर आणि मान अनेकदा काळी पडते आणि त्यांचा रंग इतर त्वचेसारखा नसतो. विशेषतः गुडघ्यांचा काळेपणा चांगला दिसत नाही तर त्यामुळे आत्मविश्वासही कमी होऊ शकतो. यामुळे बरेच लोक लहान कपडे घालणे टाळतात किंवा नेहमीच गुडघे लपवून ठेवतात.

झोपेच्या कमतरतेमुळे ‘हे’ आजार होतात, निरोगी राहण्यासाठी किती तासांची झोप आवश्यक आहे?

आजकाल बाजारात त्वचेला उजळवणारी क्रीम, लोशन आणि ब्लीच अशी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु यापैकी बहुतेक उत्पादनांमध्ये रसायने असतात, जी काही काळानंतर तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. तुमच्या गुडघ्यांचा काळेपणा दूर करायचा असेल, तर घरगुती आणि नैसर्गिक उपाय हा सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे.

दही आणि बेसन पॅक

दह्यात लॅक्टिक अॅसिड असते जे मृत त्वचा काढून टाकते आणि बेसन त्वचा स्वच्छ करते. हा उपाय त्वचेचा रंग सुधारण्यास खूप मदत करतो. याकरता २ चमचे बेसन घ्या, त्यात १-२ चमचे ताजे दही घाला आणि जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या गुडघ्यांवर लावा आणि २० मिनिटे सुकू द्या, नंतर हलक्या हातांनी घासून धुवा. हा उपाय आठवड्यातून २-३ वेळा करा.

Skin Care – ऋतूनुसार तुमच्यासाठी कोणते फेशियल योग्य आहे? वाचा

बेकिंग सोडा आणि दूध

तुमच्या गुडघ्यांवरील मृत त्वचेचा थर काढायचा असेल, तर बेकिंग सोडा आणि दूध वापरणे खूप फायदेशीर ठरू शकते. याकरता १ चमचा बेकिंग सोडामध्ये थोडे दूध मिसळा. हे मिश्रण तुमच्या गुडघ्यांना लावा आणि हलक्या हाताने स्क्रब करा, नंतर १० मिनिटांनी पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदापेक्षा जास्त वेळा असे करू नका कारण जास्त वापरल्याने त्वचा कोरडी होऊ शकते.

लिंबू आणि मध

लिंबूमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म आहेत आणि ते त्वचेचा रंग हलका करण्यास मदत करते. मध त्वचेला मॉइश्चरायझ करते तसेच ती मुलायम करण्यास मदत करते. याकरता ताज्या लिंबाचा रस काढा. त्यात १ चमचा मध घाला. हे मिश्रण गुडघ्यांवर लावावे. त्यानंतर हलक्या हातांनी २-३ मिनिटे मालिश करावे. नंतर १५-२० मिनिटे असेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून ३ वेळा असे करा आणि काही आठवड्यांत फरक दिसून येईल.

हळद आणि दुधाची पेस्ट

हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि त्वचा उजळवण्याचे गुणधर्म आहेत. दूध आपल्या त्वचेलास्वच्छ करते आणि मॉइश्चरायझ देखील करते. ही पेस्ट बनवण्यासाठी, १ चिमूटभर हळद घ्या, त्यात १-२ चमचे कच्चे दूध घाला आणि त्याची पेस्ट बनवा. ते गुडघ्यांना लावा आणि १५ मिनिटे तसेच ठेवा, नंतर साध्या पाण्याने धुवा. दररोज हा उपाय केल्याने हळूहळू परिणाम दिसू लागेल.

नारळ तेल आणि लिंबू

नारळ तेल त्वचेला खोलवर पोषण देते आणि लिंबू त्वचेचा रंग उजळवते. दोन्ही गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्यासाठी हा उपाय सर्वात उत्तम आहे. १ चमचा नारळ तेलात अर्धा लिंबू पिळून घ्या. या मिश्रणाने गुडघ्यांना ५ मिनिटे मालिश करा, नंतर १५ मिनिटांनी धुवा. हे दररोज करा आणि काही दिवसांतच त्याचा परिणाम दिसू लागेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानंगर जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा अधिकार शालेय व्यवस्थापन समित्यांना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानंगर जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा अधिकार शालेय व्यवस्थापन समित्यांना
अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा अधिकार ग्रामस्तरावरील शालेय व्यवस्थापन समित्यांना प्रदान...
अपहरण झालेल्या ट्रक चालकाचा हेल्पर सापडला पूजा खेडकर यांच्या घरात, आई मनोरमा खेडकरविरोधात गुन्हा दाखल
बायडेन सरकारमुळेच अमेरिकेत गुन्हेगारी वाढली; नागमल्लैया यांच्या हत्येनंतर ट्रम्प यांची प्रतिक्रिया
हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने समाजासमोर ठेवला अनोखा आदर्श, नवजात बालकांसाठी 30 लिटर ब्रेस्टमिल्क केले दान
‘ही’ डाळ व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता करेल दूर, वाचा सविस्तर
देवगड येथील राष्ट्रीय लोकअदालतीत 44 प्रकरणे निकाली; 14 लाख 15 हजार 840 रुपयांची वसुली
‘देवा’ जरा इकडे बघ! मराठवाड्यातील अतिवृष्टीवरून अंबादास दानवे यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका