विद्यार्थी व्हिसावर रशियात गेला, युद्धात अडकला; पंजाबच्या तरुणाला बळजबरीने सैन्यात केले सामील

विद्यार्थी व्हिसावर रशियात गेला, युद्धात अडकला; पंजाबच्या तरुणाला बळजबरीने सैन्यात केले सामील

रशियात एका हिंदुस्थानी तरुणाला बळजबरीने सैन्यात भरतीकरून त्याला युक्रेन युद्धाच्या रणांगणात पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील हा तरुण असून त्याचे नाव बुटा सिंग आहे. तो गेल्या वर्षी ऑक्टोबर 2024 मध्ये विद्यार्थी व्हिसावर मॉस्कोला गेला होता. ज्याला बळजबरीने रशियन सैन्यात भरती करत त्याला युद्धाच्या रणांगणात पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुटा सिंग याने 3.5 लाख रुपये खर्च करून दिल्लीतील एका एजंटमार्फत रशियाला गेला. विद्यार्थी विजेवर गेलेला बूट सिंग मॉस्कोमध्ये काही महिने मजूर म्हणून काम करत होता. मात्र 18 ऑगस्ट 2025 रोजी रशियन सैन्याने त्याला ताब्यात घेतले आणि सैन्यात भरती केले. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बुटा सिंगने खुलासा केला की, त्याच्यासह पंजाब आणि हरियाणातील सुमारे 14 जणांना सैन्याच्या छावणीत नेऊन कोणत्याही लष्करी प्रशिक्षणाशिवाय युद्धात उतरवले जात आहे. त्याने सांगितले की, त्यापैकी पाच ते सहा जण युद्धात बेपत्ता झाले आहेत.

बुटा सिंगचा त्याच्या कुटुंबाशी शेवटचा संपर्क 12 सप्टेंबर 2025 रोजी व्हॉट्सअॅपवरील व्हॉईस मेसेजद्वारे झाला. त्यानंतर त्याच्याशी संपर्क तुटला आहे. त्याच्या कुटुंबाने केंद्र सरकारकडे त्याला सुखरूप परत आणण्याची विनंती केली आहे. बुटा सिंगची आई म्हणाली की, “आम्ही आमच्या मुलाला कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी परदेशात पाठवले, पण आता त्याच्या जीवाला धोका आहे. आम्हाला तो हिंदुस्तानात परत हवा आहे.” बुटा हा शेतकरी रम सिंग यांचा एकुलता एक मुलगा असून, त्याला दोन बहिणी आहेत. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने मॉस्को आणि दिल्लीतील रशियन अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले, “आम्ही सर्व हिंदुस्थानी नागरिकांना रशियन सैन्यात सामील होण्याच्या कोणत्याही ऑफरपासून दूर राहण्याचे पुन्हा एकदा आवाहन करतो, कारण हा एक धोकादायक मार्ग आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ डाळीचे करा सेवन, शरीराला मिळतील अनेक फायदे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ डाळीचे करा सेवन, शरीराला मिळतील अनेक फायदे
आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांच्या बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांची कमतरता भासू लागली आहे. ज्यात जास्‍त...
सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन
Ratnagiri News – अर्बन बॅंक संशयाच्या भोवऱ्यात, राजापूर शाखेतून 100 कोटींच्या ठेवी काढल्या
भरधाव ट्रकने 10 ते 15 जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू; अनेक वाहनांना धडक
मुंबई विमानतळावर 49 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, परकीय चलन आणि वन्यजीव हस्तगत
बीड जिल्ह्यात पावसाचा कहर, तीन लाख हेक्टर खरीप पाण्यात; २०० गावांची वाहतूक ठप्प
Chandrapur News – जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांची शासकीय विश्रामगृहात दारू पार्टी, प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ