कतरिनाने देणार गोड बातमी, विकी कौशल बाबा होणार
परिणीती चोप्रानंतर अभिनेत्री कतरिना कैफने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. लग्नाच्या चार वर्षांनंतर कतरिना आई होणार आहे. याआधी अनेकदा कतरिना गरोदर असल्याचा अफवा पसरल्या होत्या. एनडीटीव्हीच्या सूत्रांनी कतरिना गर्भवती असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नाच्या चार वर्षांनंतर पालक होणार आहेत. कतरिना यावर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये बाळाला जन्म देईल, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. याआधी कतरिना कैफच्या गरोदरपणाच्या अफवा पसरल्या तेव्हा विकी कौशलने या वृत्तामध्ये काहीही तथ्य नसल्याचे म्हटले होते. ‘बॅड न्यूज’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान, विकी कौशलने म्हटले होते की जर आनंदाची बातमी असेल तेव्हा आम्ही तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List