आई म्हणजे आई असते…पुरापासून बछड्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी बिबट्याने घेतला झाडाचा आश्रय
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. अधूनमधून कधी जोराचा तर कधी संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्राण्यांनाही फटका बसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आपल्या बछड्यांना वाचवण्यासाठी बिबट्याने थेट झाडांचा आश्रय घेतल्याचे दिसून आले आहे.
चंद्रपूरातील कर्मवीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर रोज संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना एका झाडावर दोन बिबट्याचे बछडे दिसले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. बिबट्याची बछडी जरी लहान असली, तरी त्यांची आई आसपास असण्याची शक्यता आहे. पुराच्या पाण्यापासून बछड्यांचे रक्षण करण्यासाठी मादी बिबट्याने या बछड्यांना झाडावर बछड्यांना सुरक्षित ठेवले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या परिसरात बिबट्याचा वार असल्याने नागरिकात घबराट निर्माण झाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List