देवगड येथील राष्ट्रीय लोकअदालतीत 44 प्रकरणे निकाली; 14 लाख 15 हजार 840 रुपयांची वसुली
मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून येथील दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर येथे शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस. एस. पचंडी यांच्या हस्ते झाले. या लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी खटले तसेच वादपूर्व प्रकरणे अशा ११०८ पैकी एकूण ४४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून १४ लाख १५ हजार ८४० रुपये वसुली झाली.
देवगड तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकील, सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ विधीज्ञ व दिवाणी न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार, बँकांचे अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते. या लोकअदालतीत दिवाणी व फौजदारीकडील एकूण २२४ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ३४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून १ लाख ६८ हजार ९६६ रुपये वसुली झाली. बँक, महावितरण यातील ८८४ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील १० प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून एकूण १२ लाख ४६ हजार ८७४ रुपये वसुली झाली. पॅनेल सदस्य म्हणून ॲड. अमेय गुमास्ते यांनी काम पाहिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List