Cooking Tips – कारल्याचा कडवटपणा कसा कमी करावा? जाणुन घ्या

Cooking Tips – कारल्याचा कडवटपणा कसा कमी करावा? जाणुन घ्या

अनेकांना कारल्याची भाजी खायला आवडत नाही कारण ती कडू असते. विशेषतः लहान मुले फक्त त्याच्या नावानेच त्यापासून दूर पळतात. कारल्याची भाजी बनवली जाते आणि बरेच लोक त्याचे लोणचे देखील बनवतात. कारले हे विविध आयुर्वेदीक उपचारांसाठी वापरले जाते.

कडू कारल्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, ए, लोह, कॅल्शियम, जस्त, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम सारखे पोषक घटक आढळतात. म्हणून कारल्याचा आपल्या आहारात नक्की समावेश केला पाहिजे. मात्र या लेखात आपण कारल्याचा कडूपणा कसा कमी करु शकतो आणि त्यापासून स्वादिष्ट भाजी कशी बनवू शकता हे जाणून घेऊया जेणेकरून प्रत्येकजण आनंदाने आपल्या आहारात कारल्याचा करेल.

कारल्यामध्ये असलेल्या समृद्ध गुणधर्मांमुळे ते अनेक प्रकारे फायदेशीर आहे. मधुमेहींसाठी तो विशेषतः फायदेशीर मानला जातो. कारल्यामध्ये कर्करोग-विरोधी, मधुमेह-विरोधी, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध , स्थूलपणा-विरोधी गुणधर्म असतात. ही कडू भाजी तुमच्या आरोग्यासाठी सुपरफूडपेक्षा कमी नाही.

  • कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारले हलकेसे सोलून घ्या आणि छोट्या छोट्या पातळ स्लाइसमध्ये कापून घ्या. त्यानंतर हे स्लाइस दोन ते तीन तासांसाठी उन्हात वाळवून घ्या. कारलं फक्त त्याच्यातील ओलावा कमी होण्यापुरता वाळवावा.

  • कारल्याला कापल्यानंतर त्यावर हळद आणि मीठ लावून एक जाळीदार भांड्यात ठेवावा जेणेकरुन त्यातील एक्स्ट्रा पाणी निघुन जाईल आणि कारल्याचा कडवटपणा कमी होईल.

  • कारल्याची भाजी बनवण्यापुर्वी कारलं 30 मिनिटांसाठी लिंबू लावून ठेवल्याने देखील कारल्यातीत कडवपणा कमी करता येऊ शकतो.

 

 

 

हे करून पहा- जीरा राईस कसा करायचा?

 

कारल्याची भाजी बनवण्याची सोपी पद्धत

  • सर्वप्रथम, एका पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करा आणि त्यात कारले घाला आणि काही वेळ परतून घ्या. लक्षात ठेवा की ते जास्त कुरकुरीत होऊ नये.

  • त्यानंतर कारले काढून टिश्यू पेपरवर ठेवा जेणेकरून अतिरिक्त तेल कमी होईल.

  • त्यानंतर गरजेनुसार गरम तेलात जिऱ्याची फोडणी द्या आणि नंतर चिरलेला कांदा घाला आणि तो सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. आता चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला आणि त्यात लसूण-आले पेस्ट, धणे पावडर, बडीशेप पावडर आणि सुक्या आंब्याची पावडर घाला. चवीनुसार थोडे लाल मिरची आणि मीठ घाला. मसाला तयार झाल्यावर, कारले घाला आणि शिजू द्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उत्तर प्रदेशात भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ, आरोपींनी CCTV फुटेजचे DVR ही पळवले उत्तर प्रदेशात भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ, आरोपींनी CCTV फुटेजचे DVR ही पळवले
उत्तर प्रदेशात भाजप नेते आणि माजी ब्लॉक प्रमुख विनोद चौधरी यांची अज्ञात आरोपींनी हत्या केली. बुलंदशहरातील खुर्जा कोतवाली परिसरातील राहत्या...
भाजप जेव्हा सत्तेपासून दूर होईल, तेव्हाच महागाई नियंत्रणात येणार – अखिलेश यादव
झारखंडच्या बोकारोमधील नक्षलवादाचा समूळ नायनाट! अमित शहा यांचा मोठा दावा
गौतम अदानींना १०५० एकर जमीन प्रतिवर्ष १ रुपये दराने देण्यात आली, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
बदलापूरजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेवरील लोकलसेवा ठप्प
Jalna Banjara Protest – बंजारा समाजाचा जनआक्रोश मोर्चा, हैदराबाद गॅझेटनुसार ST प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी
भाजप दुतोंडी गांडूळ; विजय वडेट्टीवार यांचा निशाणा