भाजप दुतोंडी गांडूळ; विजय वडेट्टीवार यांचा निशाणा
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची घटना घडल्यानंतरही हिंदुस्थान – भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना प्रोत्साहन देणारा भाजप दुतोंडी गांडूळ असून, त्याच्या दोन्ही बाजूला तोंड व शेपूट आहे. – हा सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या व जल्लोष – करणाऱ्यांचा देशात अगरबत्ती व धूप लावून यथोचित सत्कार केला पाहिजे, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांवर कली.
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने दबावापोटी शासन निर्णय काढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ओबीसी सेल तर्फे पुण्यात ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. पक्षाच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष अनिल जयहिंद, आमदार वडेट्टीवार, सतेज पाटील, सेलचे राज्य अध्यक्ष भानुदास माळी आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर अशी ही बनवाबनवी चित्रपट सुरू असल्याचा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List