ईएमआय थकवला तर मोबाईल लॉक होणार, हप्त्यावर फोन घेणाऱ्यांसाठी नवा नियम

ईएमआय थकवला तर मोबाईल लॉक होणार, हप्त्यावर फोन घेणाऱ्यांसाठी नवा नियम

अनेक जण कर्ज काढून म्हणजेच ईएमआयवर मोबाईल खरेदी करतात. मोबाईल खरेदी केल्यानंतर काही जण कर्जाचे हप्ते भरत नाहीत. याला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक ड्राफ्ट नियम जारी केला आहे. त्यानुसार एखादा ग्राहक ईएमआय थकवला तर बँक किंवा एनबीएफसी त्याचा मोबाईल लॉक करू शकतात. ही यंत्रणा डिजिटल लोन अ‍ॅप म्हणजेच पेटीएम, फोन पे आणि इतर फिनटेक प्लॅटफॉर्म्सकडून कर्ज घेणाऱ्यांसाठी लागू असेल.

कर्ज घेताना ग्राहकांच्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक नोंदवला जाईल. जर एखाद्या व्यक्तीनं 90 दिवसांपर्यंत ईएमआय भरला नाही तर तर कर्जदाता त्या फोनला ट्रकिंग मोडमध्ये टाकू शकतो. यामुळे फोनवरून कॉल करणे, मेसेज पाठवणे किंवा अ‍ॅप्सचा वापर करणे बंद होईल. फक्त आपत्कालीन नंबर चालू राहतील.

डिजिटल कर्जाची थकबाकी वाढली

आरबीआयने छोट्या रकमेच्या कर्जांच्या वसुलीसाठी हे नवे पाऊल टाकण्याची तयारी सुरू केली आहे. हा नियम लागू झाल्यास कर्ज देणारी बँक किंवा वित्तीय संस्था तुमचा मोबाईल फोन लॉक करू शकेल. आरबीआयच्या मते डिजिटल कर्जाची थकबाकी वेगाने वाढतेय. 2022 मध्ये डिजिटल कर्जाचा एनपीए 2.5 टक्के होता, तो 2024 मध्ये 5 टक्के झाला आहे. छोट्या कर्जांमध्ये 5 हजार ते 50 हजार रुपयांच्या कर्जाचा समावेश होतो. काही लोक कर्जाचे हप्ते न भरता गायब होतात.

ग्राहकांच्या अडचणीत वाढ होणार

नवा नियम कर्ज देणाऱ्या कंपन्यांसाठी फायदेशीर असला तरी ग्राहकांसाठी त्रासदायक आहे. ग्राहकांचा फोन लॉक झाल्याने कर्जदाराची दैनंदिनी कामे खोळंबतील. काही जाणकारांनी याला डिजिटल जेल म्हटले आहे. डेटा प्रोटेक्शन कायद्याचे उल्लंघन आणि ग्राहकांना अडचणी येऊ शकतात.

आरबीआयने या ड्राफ्टवर सर्व पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत. याबाबत 2026 पर्यंत अंतिम गाइडलाइन जारी केल्या आहेत. एका अहवालानुसार बजाज फिनसर्व आणि पेटीएम पहिल्यापासून आयएमईआय ट्रक करत आहेत. ग्राहक संघटना याचा विरोध करत असून ग्राहकांच्या गोपनीयतेवर हल्ला असल्याची टीका होतेय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ सुधारणा कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काही तरतुदींना स्थगिती वक्फ सुधारणा कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काही तरतुदींना स्थगिती
वक्फ सुधारणा कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश दिला असून काही तरतुदींना स्थगिती देण्यात आली आहे. वक्फ (सुधारणा) कायद्यातील प्रमुख तरतुदी...
गुडघ्यांचा काळेपणा काढून टाकण्यासाठी हे आहेत हमखास खात्रीशीर उपाय, वाचा
आई म्हणजे आई असते…पुरापासून बछड्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी बिबट्याने घेतला झाडाचा आश्रय
33 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य, हिंदूस्थानी वंशाच्या महिलेची तुरूंगात रवानगी, वाचा नेमकं काय घडलं?
UPI Rule Change – UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी नवा नियम, 15 सप्टेंबरपासून होणार अंमलबजावणी
सोने स्वस्त होणार? US Fed च्या बैठकीकडे जगाचे लक्ष, सोन्याच्या दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
कालची मॅच फिक्स होती आणि जुगारातले 25 हजार कोटी पाकिस्तानला गेले – संजय राऊत