भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता गर्दीचे व्यवस्थापन होणार, सोयी-सुविधा मिळणार
श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडय़ाच्या अनुषंगाने कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी-सुविधा पुरविण्यासाठी तयार केलेल्या 288.17 कोटींच्या विकास आराखडय़ास प्रशासकीय मान्यता मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांना आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या आराखडय़ास 28 जून रोजी मंजुरी दिली होती. मात्र, प्रशासकीय मान्यता मिळाली नव्हती. आता ती मिळाल्याने विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य पुरातत्व विभाग, वन, वन्यजीव विभाग, सार्वजनिक विद्युत विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आदी यंत्रणांच्या समन्वयाने हा आराखडा कार्यान्वित होणार आहे. या आराखडय़ाची अंमलबजावणी तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे.
बस स्थानक, ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकास
या टप्प्यात दुकाने, सभामंडप, कमळजा सभागृह, प्रशासन कार्यालय यासाठी 18.36 कोटी, स्वच्छतागृहांसाठी 1.32 कोटी, महादेव वनविकास, बॉम्बे पॉइंट विकास आणि जंगल ट्रेलसाठी 14.53 कोटी, श्री राम मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री साक्षी गणेश मंदिर, अंजनीमाता मंदिर, हनुमान मंदिर आणि कुंडाच्या जीर्णोद्धारासाठी 3.89 कोटी, ऍम्फी थिएटर, प्लाझा, फर्निचर, पाणीपुरवठा, नाली लाइन, काँक्रीटीकरणासाठी 12.86 कोटी.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List