Mumbai rain update: मुंबईत पावसाची बॅटिंग, कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल
अवघ्या काही दिवसांची विश्रांतील घेतल्यानंतर मुंबईसह राज्यातील अनेक भागात पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. सोमवारी, पहाटेपासूनच मुंबई ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जोरदार पाऊस सुरू असून चाकरमान्याना आपल्या गंतव्य ठिकाणी पोहोचण्यास उशीर होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पावसामुळे रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तर मुंबईत काही काळ पाऊस असाच सुरू राहिल्यास रेल्वे वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
YouTube वर व्हिडीओ पाहण्यासाठी:
https://youtube.com/shorts/kYa10Odv0JA?si=SmIUZoJ7Xf2-SHey
Instagram वर व्हिडीओ पाहण्यासाठी:
Facebook वर व्हिडीओ पाहण्यासाठी:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List