जगातील पहिली एआय मंत्री, भ्रष्टाचार रोखण्यासाठी अल्बेनिया देशाकडून कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर
कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय) वापर प्रत्येक क्षेत्रात वेगाने होत आहे. मात्र या एआयने राजकारण आणि शासकिय क्षेत्रातही प्रवेश केला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एआयचा वापर केला जात असून अल्बेनिया हा सरकारमध्ये एआय मंत्री नियुक्त करणारा पहिला देश आहे. या व्हर्च्युअल महिला मंत्र्यांचे नाव डिएला आहे, ज्याचा अर्थ ‘सूर्य’ असा होतो.
अल्बेनियाच्या नॅशनल एजन्सी फॉर इन्फॉर्मेशन सोसायटीच्या वेबसाइटनुसार, डिएला तिची कर्तव्ये पार पाडण्यासाठी अद्ययावत एआय मॉडेल्स आणि तंत्रांचा वापर करेल. व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून सुरुवात केली डिएलाची जानेवारीमध्ये एआय-ऑपरेटेड डिजिटल असिस्टंट म्हणून ओळख करून देण्यात आली होती. ती पारंपारिक अल्बेनियन पोशाख परिधान केलेल्या महिलेसारखी डिझाइन केलेली होती. तिचे काम नागरिकांना अधिकृत ई-अल्बेनिया प्लॅटफॉर्मवर नेव्हिगेट करण्यास मदत करण्याच्या उद्देशाने होते. डिएलाने आतापर्यंत 36,600 डिजिटल कागदपत्रे जारी करण्याची सुविधा दिली आहे आणि या प्लॅटफॉर्मद्वारे जवळपास 1,000 सेवा प्रदान केल्या गेल्या आहेत अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा म्हणाले की, डिएला ही एक कॅबिनेट सदस्य असेल जी प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाही परंतु ती व्हर्च्युअल पद्धतीने तयार करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List