बोरामणीजवळ एसटीचा अपघात; 16 जखमी
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसने कंटेनरला ठोकरले असून, यात 16 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बिदर-पंढरपूर या बसला अपघात झाला असून, जखमी प्रवाशांना शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कर्नाटकातील एस.टी. बस बिदरहून पंढरपूरकडे निघाली होती. सोलापूर हैदराबाद रोडवरील बोरामणी गावाजवळ एस.टी. बसने कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ठोकरले. हा अपघात इतका भीषण होता की, एस.टी. चालकाकडील एक बाजू कापली आहे. यात बसमधील 16 प्रवासी गंभीर जखमी झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List