शहा पुरस्कृत मिंधे गटाचा खरा चेहरा उघड, मराठी माणसाच्या आंदोलनाला मुंबईत परवानगी देऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र!
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण आंदोलन केले. या आंदोलनाला यशही आले आणि सरकारने बहुतेक मागण्या मान्य केल्याने हजारो आंदोलक गुलाल उधळत घरी गेले. मात्र या आंदोलनाला परवानगी देऊ नये म्हणून मिंधे गटाच्या खासदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याचा गौप्यस्फोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी एक्सवर मिंधे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्र शेअर केले आहे. “अमित शहा पुरस्कृत शिंदे गटाचा हाच खरा चेहरा आहे. मुंबईत मराठी माणूस त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी एकवटला याची पोटदुखी उघड झाली आहे. शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईत मराठी माणसाच्या आंदोलनास परवानगी देऊ नये असे मुख्यमंत्र्याना लिहिले होते. त्यामुळे बाळासाहेबांचा फोटो वापरणे बंद करा!“, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
अमित शहा पुरस्कृत शिंदे गटाचा हाच खरा चेहरा आहे; मुंबईत मराठी माणूस त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी एकवटला याची पोटदुखी उघड झाली आहे
शिंदे गटाचे खा॰ मिलिंद देवरा यांनी द॰मुंबईत मराठी माणसाच्या आंदोलनास परवानगी देऊ नये असे मुख्यमंत्र्याना लिहिले
बाळासाहेबांचा फोटो वापरणे बंद करा! pic.twitter.com/MUb95lP6Kq— Sanjay Raut (@rautsanjay61) September 4, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List