असं झालं तर… मुदतपूर्व एफडीचे पैसे काढायचे…
फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडी ही पाच वर्षे, दहा वर्षांसाठी केली जाते, परंतु बऱ्याचदा एफडी केल्यानंतर वर्ष-दोन वर्षांनंतर पैशांची गरज भासते.
जर तुम्हाला मुदतपूर्व म्हणजे एफडीचे वर्ष पूर्ण होण्याआधीच एफडी बंद करून पैसे मिळवायचे असतील तर यासाठी काय करावे लागते, हे जाणून घ्या.
10 हजार असो की 10 लाख, पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्यास तत्काळ जवळच्या बँक शाखेत जाऊन पैशांची माहिती द्या.
सर्वात आधी बँकेच्या शाखेत जा किंवा नेट बँकिंगवर ‘फिक्स्ड डिपॉझिट्स’ विभागात जाऊन मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
मुदतीपूर्वी पैसे काढल्यास तुम्हाला कमी दराने व्याज मिळते. त्यामुळे एकूण परतावा कमी होतो. तसेच मुदतीपूर्व एफडी मोडल्यास बँक दंडसुद्धा आकारते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List