अंतिम फेरी गाठण्यासाठी जैसवाल-अय्यर सज्ज, पश्चिम विभाग-मध्य विभाग यांच्यात आजपासून उपांत्य लढत
दुलीप करंडक 2025-26 च्या उपांत्य सामन्यात शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखालील बलाढय़ पश्चिम विभाग अनुभवी रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील मध्य विभागाविरुद्ध भिडणार आहे. श्रेष्ठत्वाच्या लढाईत कोणता संघ बाजी मारतो ते पुढील चार दिवसांच्या खेळात कळेलच.
मध्य विभागाने ईशान्य विभागाविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर उपांत्य फेरी गाठली. मात्र आता त्यांना यशस्वी जैसवाल, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड आणि तुषार देशपांडे यांच्यासारख्या ताऱयांनी सजलेल्या पश्चिम विभागाशी झुंज द्यावी लागणार आहे. सरफराज खान दुखापतग्रस्त असल्याने त्याला वगळण्यात आले आहे. गोलंदाजीत ठाकूर आणि देशपांडे वेगवान माऱयाचे नेतृत्व करतील, तर शम्स मुलानी व तनुष कोटियन फिरकीची जबाबदारी सांभाळतील.
प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादव आशिया कपसाठी हिंदुस्थानच्या संघात समाविष्ट झाल्याने मध्य विभागाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार ध्रुव जुरेलदेखील किरकोळ दुखापतीमुळे बाजूला झाला असून विदर्भचा अक्षय वाडकर त्याच्या जागी संघात दाखल झाला आहे. अशा परिस्थितीत अनुभवी फलंदाज रजत पाटीदारच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी आहे. उपांत्यपूर्व फेरीत पाटीदार व शुभम शर्मा यांनी शतपं झळकावली, तर दानिश मालेवारने द्विशतक ठोकून दमदार कामगिरी केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List