किणी टोलनाक्यावर 77 लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

किणी टोलनाक्यावर 77 लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

पुणे-बंगळुरू महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) पथकर नाक्यावर अवैधरीत्या वाहतूक करण्यात येणाऱ्या 62 लाखांच्या गुटख्यासह तस्करी करणारा टेम्पो, असा 77 लाख रुपयांचा मुद्देमाल पकडण्याची कारवाई जयसिंगपूर व वडगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी केली.

गडहिंग्लज विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातून गुटखा भरलेला कंटेनर मुंबईकडे जाणार असल्याचे समजले. त्यांनी जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. यानुसार जयसिंगपूर विभागीय पोलिसांचे पथक व वडगाव ठाण्याचे उपनिरीक्षक खालिक इनामदार यांच्या नेतृत्वाखालील हवालदार संदीप बांडे, प्रकाश हंकारे, अनिल अष्टेकर यांच्या पथकाने किणी पथकर नाक्याजवळ सापळा लावला.

मंगळवारी दुपारी संशयित टेम्पो नाक्याजवळ आला असता, तो रोखण्यात आला. चालकास गाडीत काय, असे विचारले असता, त्याने दिशाभूल करणारी उत्तरे दिली. मात्र, कुलूप काढून पाहिले असता, त्यात पानमसाला व सुगंधी तंबाखूची पोती भरलेली आढळली. चालक शहजाद महंमद मुबीनखान (वय 40, रा. हुसेनाबाद, ता. जि. सुलजयपूर उत्तर प्रदेश, सध्या रा. बैंगणवाडी, शिवाजीनगर, मुंबई) व त्याचा साथीदार रिजवान अहमदखान ऊर्फ रजा (वय 32, रा. कोटीया, ता. कुरवार, जि. सुलतानपूर उत्तर प्रदेश) या दोघांना ताब्यात घेऊन टेम्पो वडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आला. या ठिकाणी पंचनामा करण्यात आला. यामध्ये प्रतिबंधित विमल केसरयुक्त पान मसाल्याची 156 पोती आढळून आली. या 62 लाख 45 हजार 360 रुपये किमतीच्या पान मसाल्यासह 15 लाख रुपये किमतीचा कंटेनर, असा 77 लाख 45 हजार 360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai Accident : लालबागमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; 2 मुलांना चिरडले, चिमुकलीचा मृत्यू Mumbai Accident : लालबागमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; 2 मुलांना चिरडले, चिमुकलीचा मृत्यू
मुंबईत विसर्जनाच्या दिवशी पहाटेच्या सुमारास लालबागमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. अज्ञात कार चालकाने दोन मुलांना चिरडले. या भीषण अपघातात...
पिंट्या असो की तात्या… थोडं लक्ष द्या… वयानुसार रात्री किती वाजता झोपलं पाहिजे? घ्या जाणून
मिरा भाईंदर पोलिसांकडून तेलंगणा राज्यातील ड्रग्स फॅक्टरी उद्ध्वस्त, ड्रग्स कारखान्यात अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांचा सहभाग
लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन येताना तरुणाच्या बाईकला अपघात, एकाचा मृत्यू
डोनाल्ड ट्रम्प अखेर नरमले; हिंदुस्थान-अमेरिका संबंधांना नवे वळण, सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता…
कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’? टोळीयुद्धावरून रोहित पवार यांचा सवाल
जयपूरमध्ये चार मजली इमारत कोसळली; वडील आणि मुलीचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती