युक्रेनने वाटाघाटीद्वारे युद्ध संपवावे, अन्यथा मी ते बळजबरीने संपवीन, पुतिन यांनी झेलेन्स्कीचा प्रस्ताव फेटाळला
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला स्पष्ट इशारा दिला आहे. पुतिन यांनी म्हटले की, युक्रेनने वाटाघाटींद्वारे हे युद्ध संपवावे, अन्यथा मी ते बळजबरीने संपवीन. युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलेन्स्की यांच्या प्रस्तावाला पुतिन यांनी फेटाळले असून, मॉस्कोमध्ये चर्चेसाठी झेलेन्स्की यांना आमंत्रित केले आहे. मात्र, युक्रेनने हा प्रस्ताव नाकारला आहे.
पुतिन यांनी बुधवारी चीन भेटीच्या शेवटच्या दिवशी बीजिंगमध्ये माध्यमांशी बोलताना हे विधान केले. त्यांनी म्हटले, “मला वाटते की युद्ध संपवण्यासाठी स्वीकारार्ह तोडग्यावर सहमती होणे शक्य आहे.” जर झेलेन्स्की मॉस्कोला आले तर ते त्यांच्याशी वाटाघाटी करण्यास तयार आहेत, असंही पुतीन म्हणाले आहेत. तर दुसरीकडे झेलेन्स्की संभाव्य कराराच्या अटींवर चर्चा करण्यासाठी पुतिन यांच्याशी भेटीसाठी दबाव आणत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List