हिंदुस्थानचा अफगाणिस्तानला मदतीचा हात, भूकंप पीडितांसाठी पाठवलं २१ टन मदत साहित्य

हिंदुस्थानचा अफगाणिस्तानला मदतीचा हात, भूकंप पीडितांसाठी पाठवलं २१ टन मदत साहित्य

अफगाणिस्तानातील भूकंपग्रस्तांसाठी हिंदुस्थानने पुन्हा एकदा मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. हिंदुस्थानने अफगाणिस्तानला २१ टन मदत साहित्य पाठवलं असून, यामध्ये जीवनावश्यक वस्तू, औषधं आणि तात्पुरत्या निवाऱ्यासाठी लागणारं साहित्य समाविष्ट आहे. संयुक्त राष्ट्रांनी (UN) ही मदत स्वागतार्ह असल्याचं म्हटलं असून, आणखी मदतीची गरज असल्याचं आवाहन केलं आहे.

अफगाणिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, अनेक लोक बेघर झाले आहेत. या संकटात हिंदुस्थानने तातडीने पावलं उचलत ही मदत पाठवली आहे. हिंदुस्थान नेहमीच संकटकाळात अफगाणिस्तानच्या पाठीशी उभा राहिला असून, यापूर्वीही अनेकदा मानवतावादी मदत पुरवली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी हिंदुस्थानच्या या पुढाकाराचं कौतुक केलं आहे. मात्र अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर असल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाने अधिक मदत पाठवावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. हिंदुस्थानने पाठवलेल्या या मदतीमुळे भूकंपग्रस्तांना दिलासा मिळण्याची आशा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;