Ratnagiri News – गोवा बनावटीच्या दारूची कंटनेरमधून वाहतूक, मुंबईच्या भरारी पथकाकडून सापळा रचत कारवाई

Ratnagiri News – गोवा बनावटीच्या दारूची कंटनेरमधून वाहतूक, मुंबईच्या भरारी पथकाकडून सापळा रचत कारवाई

राज्य उत्पादन शुल्क मुंबईच्या भरारी पथकाने राजापूर तालुक्यातील पन्हाळे तर्फ सौंदळ येथे सापळा रचत कारवाई केली. या कारवाईत एका कंटेनरमधील गोवा बनावटीच्या दारूचे 2 कोटी 11 लाख 72 हजार 280 रूपयांचे 1866 बॉक्स जप्त केले. मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात येत असल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबईच्या भरारी पथकाने पाळत ठेवून पन्हाळे तर्फ सौंदळ येथे निनादेवी मंदिरासमोर टाटा कंपनीचा ट्रक कंटेनर पकडला. या कंटनेरमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे 1866 बॉक्स सापडले. ट्रक चालक आसिफ आस मोहम्मद याला अटक करण्यात आली आहे. 25 लाख रूपये किंमतीचा ट्रक आणि 2 कोटी 11 लाख 72 हजार 280 रूपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचा महसूल बुडवून आंतरराज्य टोळ्या कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अवैध दारू सापडल्यास टोल फ्री वर कळवा

आपल्या जवळपास अवैध दारूची निर्मिती किंवा विक्री किंवा वाहतूक सुरू असेल तर उत्पादन शुल्क विभागाच्या 18008333333 या टोल फ्री वर किंवा फोन क्रमांक 022-22663881 वर माहिती कळवा असे उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईच्या भरारी पथकाने आवाहन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या लोकांनी चुकूनही अननस खाऊ नये; जाणून घ्या अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होईल या लोकांनी चुकूनही अननस खाऊ नये; जाणून घ्या अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होईल
फळे आपल्या आरोग्यासाठी नेहमीच चांगली असतात. पण काहीजणांसाठी सगळीच फळे फायदेशीर असतात, त्यांना फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. जसं की...
युक्रेनने वाटाघाटीद्वारे युद्ध संपवावे, अन्यथा मी ते बळजबरीने संपवीन, पुतिन यांनी झेलेन्स्कीचा प्रस्ताव फेटाळला
हिंदुस्थानचा अफगाणिस्तानला मदतीचा हात, भूकंप पीडितांसाठी पाठवलं २१ टन मदत साहित्य
Ratnagiri News – गोवा बनावटीच्या दारूची कंटनेरमधून वाहतूक, मुंबईच्या भरारी पथकाकडून सापळा रचत कारवाई
तेलंगणातील विद्यार्थ्यांचा ब्रिटनमध्ये अपघाती मृत्यू; गणेश विसर्जन करून घरी परतत असताना काळाचा घाला
Ratnagiri News – अंमली पदार्थाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यवाहीचे निर्देश
खुर्चीवर बसून काम करताय? सायलेंट हार्ट अटॅक ठरू शकतो जीवघेणा; काय काळजी घ्यावी?