फिटनेस चाचणीत विराटला विशेष सूट, विराटची चाचणी लंडनमध्ये झाल्याने बीसीसीआयवर टीका
हिंदुस्थानचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आगामी एकदिवसीय मालिकेसाठी फिट आहे. त्याच्या फिटनेसला कुणी आव्हान देऊ शकत नाही, मात्र फिटनेस टेस्टसाठी त्याला लंडनमध्ये देण्यात आलेली विशेष सूट टीकेला कारण ठरली आहे. एकीकडे हिंदुस्थानच्या सर्व राष्ट्रीय खेळाडूंची फिटनेस चाचणी बंगळुरूत झाली असताना एकटय़ा विराटची चाचणी लंडनमध्ये घेण्याच्या बीसीसीआयने दिलेल्या विशेष परवानगीमुळे दोघेही अडचणीत आले आहेत.
या वर्षाच्या अखेरीस सुरू होणाऱया आंतरराष्ट्रीय हंगामापूर्वी बीसीसीआयने घेतलेल्या या फिटनेस आढाव्यात रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, शुभमन गिल व मोहम्मद सिराज यांच्यासारख्या प्रमुख खेळाडूंची 29 ऑगस्ट रोजी चाचणी घेण्यात आली होती. यात सारे फुल मार्कस् घेऊन पासही झाले. मात्र कोहलीला लंडनमध्येच देखरेखीखाली चाचणी देण्याची मुभा मिळाली. सर्व खेळाडू समान असताना विराटसाठी विशेष परवानगी पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे टेस्टमधून निवृत्त झालेल्या विराटला फिटनेस टेस्ट अडचणीत आणण्याची शक्यता आहे.
कोहलीने टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो सध्या फक्त एकदिवसीय क्रिकेटसाठी उपलब्ध आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱया ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी तो संघात असेल, अशी अपेक्षा आहे. बीसीसीआयच्या फिजिओथेरपिस्ट व फिटनेस तज्ञांनी मंडळाला सादर केलेल्या अहवालात कोहलाच्या लंडनमधील टेस्टचाही समावेश आहे.
आनंदाचा क्षण काही क्षणातच दुःखात बदलला! चेंगराचेंगरीवर अखेर तीन महिन्यांनी विराटने सोडले मौन
अशी सूट सर्वांना मिळणार?
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने फिटनेस चाचणीच्या पद्धतीत झालेल्या बदलावर थेट भाष्य टाळले. मात्र कोहलीने पूर्वपरवानगी घेतली असावी, असे त्यांनी सूचित केले. या घटनेमुळे मात्र शांतपणे चर्चा सुरू झाली आहे की, भविष्यात परदेशात असलेल्या किंवा वैयक्तिक कारणांमुळे उपलब्ध नसलेल्या इतर खेळाडूंनाही अशा प्रकारे सूट दिली जाईल का?
फिटनेस चाचणीच्या पहिल्या टप्प्यात रोहित शर्मा, बुमरा, गिल, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि संजू सॅमसन यांची चाचणी घेण्यात आली. तसेच ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा व रिंकू सिंग यासारख्या खेळाडूंनीही जोशात फिटनेसचे निकष सिद्ध केले. आता दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये होणार असून त्यात पुनर्वसन किंवा खेळात पुनरागमन टप्प्यातील खेळाडूंचा समावेश असेल. के.एल. राहुल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत व नितीश रेड्डी यांचे पुढील महिन्यात मूल्यमापन अपेक्षित आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List