ओबीसींवर अन्याय झाला तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का? संजय राऊत यांचा सवाल
मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ सध्या नाराज आहेत. ते मंत्रीमंडळाच्या बैठकीला देखील गैरहजर राहिल्याच्या चर्चा आहेत. त्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘मराठा आरक्षणामुळे ओबीसींवर अन्याय झाला असं वाटत असेल तर छगन भुजबळ राजीनामा देणार आहेत का? असा सवाल त्यांना केला आहे.
”एखाद्या समाजावर अन्याय झालाय असं वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रीमंडळातून बाहेर पडलं पाहिजे. भुजबळ राजीनामा देणार आहेत का? जसा नेहरूंच्या सरकारमध्ये सीडी देशमुख यांनी राजीनामा दिला होता. तुम्ही एका बाजुला सांगताय मी ओबाीसीचा नेता आहे व दुसऱ्या बाजूला मंत्रीमंडळात बसताय. आपल्या समाजावर अन्याय झाला असं म्हणताय व कॅबिनेटवर बहिष्कार घालताय याचा अर्थ तुमचा कॅबिनेटवर विश्वास नाही. शिवसेनाप्रमुखांनी जातीपातीचं राजाकरण करत नाही असं सांगितल्यानंतर त्यावेळी तुम्ही मंडळच्या मुद्द्यावर शिवसेना सोडली होती. तर आता तुम्ही तुमच्या जातीच्य़ा मुद्द्यावर मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे संजय राऊत यांनी छगन भुजबळांना सुनावले
”महाराष्ट्र जातीपातीमध्ये कधीही एवढा फाटला गेला नव्हता. प्रत्येक जातीसाठी उपसमिती हे या राज्याचं चित्र कधीही नव्हतं. दुर्दैवाने गेल्या दहा वर्षात जे जातीचं राजकारण सुरू आहे तसं कधीच नव्हतं हा मूळ विचार पुरोगामी महाराष्ट्राचा नाबी. आम्ही मराठी माणसं एकत्र होतो. त्यांच्यात फूट पाडण्यासाठी आधी शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. आता अनेक जातीचं गट करून समित्या नेमणं हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला शोभणारं नव्हतं. फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राची प्रतिमा धुळीस मिळाली आहे”, अशा शब्दात संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List