2027 च्या वर्ल्ड कपमध्ये रोहित-विराट खेळू शकतात – आकाश चोप्रा
हिंदुस्थानी संघात होत असलेल्या नवनव्या बदलांमुळे विराट कोहली व रोहित शर्मा यांना एकदिवसीय संघात स्थान मिळण्याबाबतही आतापासून शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये ते खेळतील का, असा सर्वांनाच प्रश्न पडला असताना माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने दोघेही 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळू शकतात, असा अंदाज वर्तवताना या दोघांकडे अजूनही काwशल्य तसेच फिटनेस असल्याचे मत मांडलेय. आगामी वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत होणार असल्याने तेथे हिंदुस्थानी संघाला अनुभव आणि काwशल्याची मोठी गरज भासेल. त्यामुळे तेथे दोघेही संघात असतील, पण ती वेळ अजून दूर आहे, पण त्यांच्याकडे संधी निश्चितच असल्याचे चोप्राने स्पष्ट केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List