गणेश सजावट स्पर्धेत नागरी निवारा महासंघाची बाजी,शिवसेना दिंडोशी विधानसभेच्यावतीने आयोजन

गणेश सजावट स्पर्धेत नागरी निवारा महासंघाची बाजी,शिवसेना दिंडोशी विधानसभेच्यावतीने आयोजन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना दिंडोशी विधानसभा क्षेत्रा अंतर्गत आयोजित केलेल्या सार्वजनिक व घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024चा पारितोषिक वितरण समारंभ पारेखनगर सभागृहात उत्साहात संपन्न झाला. यात नागरी निवारा महासंघाने प्रथम क्रमांक पटकावला. वायशेत पाडा गणेशोत्सव मंडळाने दुसरा तर जय संतोषी माता गृहनिर्माण संस्थेने तिसरा क्रमांक पटकावला.

शिवसेना नेते, विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धांमध्ये 100 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व 70 घरगुती गणेश मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. विजेत्यांना आमदार सुनील प्रभू, शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर आणि विभागसंघटक शालिनी सावंत यांच्या हस्ते रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले. घरगुती गणेश सजावट स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे प्रत्येकी आठ स्पर्धक याप्रमाणे 24 विजेत्या स्पर्धकांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. याशिवाय 24 स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे.

या वेळी विभागसंघटक प्रशांत कदम, विधानसभा समन्वयक रिना सुर्वे, आशा केणी, वैभवी पाटील, माजी उपमहापौर सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, उपविभागप्रमुख गणपत वारिसे, भाई परब, प्रदीप निकम, सुनील गुजर, ऋचिता आरोस्कर, सानिका शिरगावकर, वृंदा पालेकर, विद्या गावडे आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पावसाळ्यात पाणी उकळल्यामुळे त्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात का? पावसाळ्यात पाणी उकळल्यामुळे त्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात का?
पाणी आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे, परंतु कधीकधी त्यात हानिकारक बॅक्टेरिया, विषाणू आणि परजीवी असू शकतात. घाणेरडे पाणी, पाईपलाईन गळती किंवा...
तुमची सुद्धा सारखी चिडचिड होते का? जाणून घ्या त्या मागचे मुख्य कारण….
विकास कसा होऊ शकतो हे आपण बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातून दाखवून दिलं – आदित्य ठाकरे
ओव्हल मैदानावर गौतम गंभीर पिच क्युरेटरवर भडकला, पाहा व्हिडीओ
आदित्य ठाकरे यांनी केली बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील फेज-1 च्या कामाची पाहणी
छत्तीसगडमध्ये चकमकीत एक नक्षलवादी ठार, आईडी स्फोटात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी
Operation Sindoor Debate – जगातील कुठल्याच नेत्याने ऑपरेशन सिंदूर रोखले नाही, पंतप्रधान मोदींचा दावा; ट्रम्प यांचे नाव घेणे टाळले