मराठी चित्रपटांसाठी स्क्रीनचा श्रेयवाद; शिंदेंनी बोलावलेली बैठक फडणवीसांनी रद्द केली,सांस्कृतिक मंत्रालयातील ढवळाढवळ रोखली

मराठी चित्रपटांसाठी स्क्रीनचा श्रेयवाद; शिंदेंनी बोलावलेली बैठक फडणवीसांनी रद्द केली,सांस्कृतिक मंत्रालयातील ढवळाढवळ रोखली

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या खात्यामधील बैठकांच्या वादामुळे महायुतीमधील बेबनाव पुढे आला आहे. त्यातच आता सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार परदेश दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मल्टिप्लेक्समधील मराठी चित्रपटांना स्क्रीन देण्याच्या संदर्भात उद्या मंत्रालयात तातडीची बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न केला होता, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘चाप’ लावल्याने एकनाथ शिंदे यांना बैठक रद्द करावी लागली आहे.

सध्या ‘सैयारा’ या हिंदी चित्रपटाची सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर मोठी चर्चा रंगली आहे. या चित्रपटासाठी थिएटर मालकांनी मराठी चित्रपटांच्या स्क्रीनची संख्या कमी केल्याने, मनसे आणि मल्टिप्लेक्स मालकांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.

मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये स्क्रीन मिळवून देण्याचे श्रेय लाटण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच पत्र जारी करून उद्या तातडीने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील समिती कक्षात तातडीची बैठक आयोजित केली.

या बैठकीत निमंत्रितांच्या यादीमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच चित्रपट उद्योगाशी संबंधित संघटनांचे पदाधिकारी, मल्टिप्लेक्सचे मालक व अन्य लोकांना निमंत्रित करण्यात आले होते.

बैठकीचे इतिवृत्त पाठवण्याचे आदेश

एकनाथ शिंदे यांनी परस्पर सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱयांना बोलावून परस्पर बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न केला. येवढेच नव्हे तर बैठक झाल्यावर बैठकीचे इतिवृत्तही उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या मान्यतेसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्याचे आदेशही देण्यात आले. सांस्कृतिक मंत्री परदेशात असताना त्यांच्या विभागाला बैठक घेण्याचे आदेश कसे देण्यात आले, याची चर्चा सुरू होताच मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल घेतली. त्यामुळे ही बैठक अखेर रद्द झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विकास कसा होऊ शकतो हे आपण बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातून दाखवून दिलं – आदित्य ठाकरे विकास कसा होऊ शकतो हे आपण बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातून दाखवून दिलं – आदित्य ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज- 1 ची...
ओव्हल मैदानावर गौतम गंभीर पिच क्युरेटरवर भडकला, पाहा व्हिडीओ
आदित्य ठाकरे यांनी केली बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील फेज-1 च्या कामाची पाहणी
छत्तीसगडमध्ये चकमकीत एक नक्षलवादी ठार, आईडी स्फोटात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी
Operation Sindoor Debate – जगातील कुठल्याच नेत्याने ऑपरेशन सिंदूर रोखले नाही, पंतप्रधान मोदींचा दावा; ट्रम्प यांचे नाव घेणे टाळले
ग्राहकांवरून दोन दुकानदारांमध्ये तुफान राडा; दगडफेक, लाठ्या-काठ्यांनी हल्ला; महिला गंभीर जखमी
गृहमंत्री अमित शाहांची संसदेत खोटी माहिती, संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहार प्रकरणी गप्प का? अतुल लोंढे यांचा सवाल