चाकरमान्यांसाठी खुषखबर, गणेशोत्सव काळात राज्य सरकार कोकणात चालवणार पाच हजार बसेस

चाकरमान्यांसाठी खुषखबर, गणेशोत्सव काळात राज्य सरकार कोकणात चालवणार पाच हजार बसेस

चाकरमान्यांसाठी एक खुषखबर आहे. गणेशोत्सव जवळ आला की मुंबई ठाण्यातल्या चाकरमान्यांची पावलं आपल्या गावी कोकणाकडे वळतात. गणपतीत गावी जाणाऱ्यांसाठी सरकारने पाच हजार एसटी बसेसची सोय केली आहे. चाकरमान्यांना ऑनलाईन या बसचे तिकिटही बुक करता येणार आहे.

गणेशोत्सव 2025 ची तयारी म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान मुंबईहून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी 5 हजार अतिरिक्त बससेवा सुरू करणार आहे.

या अतिरिक्त बसेससाठी आरक्षण करण्यासाठी अधिकृत वेबसाइट (npublic.msrtcors.com), बस डेपो किंवा एसटीचा मोबाईल अ‍ॅपवरून करता येईल. या विशेष बसेस मुंबई, ठाणे, पालघर आणि इतर महत्त्वाच्या केंद्रांवरून सोडण्यात येणार आहेत. गट आरक्षण 22 जुलैपासून सुरू होणार असून, त्यावर प्रवाशांना भाडे सवलती मिळणार आहेत.

यंदा देण्यात येणाऱ्या अतिरिक्त बससेवा गेल्या वर्षीच्या 4 हजार 300 बसांच्या तुलनेत अधिक आहेत. ही योजना आषाढी एकादशी यात्रेच्या यशस्वी आयोजनामुळेही प्रेरित झाली आहे. त्या वेळी एसटी महामंडळाने 5 हजार 200 अतिरिक्त बस सोडल्या होत्या आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

बससेवा सुरळीत चालू राहण्यासाठी कोकणातील महत्त्वाच्या रस्त्यांवर दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. बसस्थानकांवर आणि थांब्यांवर 24 तास कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निरीक्षण ठेवले जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वॉक केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यायला हवे,अनेक लोकांना माहिती नाही वॉक केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यायला हवे,अनेक लोकांना माहिती नाही
मॉर्निंग वॉक वा कोणतीही एक्सरसाईज केल्यानंतर अनेक लोकांना लागलीच तहान लागते. त्यावेळी अनेक लोक लागलीच कोणताही विचार न करता पाणी...
Bengluru Rape Case – महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर प्रोफेसरसह दोन मित्रांकडून लैंगिक अत्याचार, आरोपी अटक
जातीच्या विचारांवर चालणारे राजकीय पक्ष देशासाठी धोकादायक; सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण मत
Ratnagiri News – कोकणात पावसाचा जोर कायम, राजापूरात नद्यांची पाणी पातळी वाढली
Ratnagiri News – राजापूरमध्ये गोवा बनावटीची लाखो रुपयांची दारू जप्त, एक जण अटकेत
प्रवीण गायकवाड शाईफेकीनंतर सोलापुरात मराठा समाजाची बैठक, दोन गटात राडा
शस्त्रास्त्रे दिली तर मॉस्कोवर हल्ला कराल काय? रशियावर संतप्त झालेल्या ट्रम्प यांची झेलेन्स्कींना ऑफर