नखे अस्वच्छ झाली तर? हे करून पहा
हाताची नखे वाढवणे अनेकांना आवडते, परंतु ते स्वच्छ ठेवणे मोठे जिकिरीचे काम आहे. जर नखे अस्वच्छ झाली असतील तर दररोज हात स्वच्छ धुवा. यामुळे नखांवरील धूळ आणि माती निघून जाईल. कोमट साबणाच्या पाण्यात दोन्ही हात पाच मिनिटे भिजवून ठेवल्यास नखे मऊ होतील व घाण निघून जाईल. स्वच्छ टूथब्रश किंवा नैलपिकने नखांच्या खालील भाग स्वच्छ करा.
नखे स्वच्छ केल्यानंतर स्वच्छ टॉवेलने कोरडी करा. गरज वाटल्यास नखे कापून घ्या. यामुळे नखे लहान राहतील आणि नखात घाण जमा होणार नाही. नखे स्वच्छ करताना जास्त जोर लावून ती घासू नका. यामुळे नखांना दुखापत होऊ शकते. नखांचा खालील भाग स्वच्छ करण्यासाठी तीक्ष्ण वस्तू वापरणे टाळावे. नखांच्या कडा आणि कोपऱयांमध्ये जमा झालेली घाण काढण्यासाठी विशेष लक्ष द्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List