Sardar Fauja Singh : जगप्रसिद्ध धावपटू सरदार फौजा सिंह यांचे 114 व्या वर्षी अपघाती निधन, घराबाहेर दिली कारने धडक

Sardar Fauja Singh : जगप्रसिद्ध धावपटू सरदार फौजा सिंह यांचे 114 व्या वर्षी अपघाती निधन, घराबाहेर दिली कारने धडक

जगप्रसिद्ध धावपटू सरदार फौजा सिंह यांचे वयाच्या 114 व्या वर्षी निधन झाले. जगभरात त्यांना ‘टर्बन टोरनॅडो’या नावाने ओळखले जात असे. त्यांच्या पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील मूळ गावी त्यांना वाहनाने धडक दिली. दुपारी 3 वाजून 30  मिनिटांनी हा अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्यानंतर ही दुर्दैवी घटन घडली. अपघातानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. या अपघाताचे फोटो सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल होत असून, यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

फौजा सिंह यांचे आयुष्य कुणालाही प्रेरणादायी असेच होते. त्यांचे बालपण अतिशय खडतर हलाखीत गेले. ते पाच वर्षांचे होईपर्यंत चालू शकत नव्हते म्हणून कुटूंबाच्या दृष्टीने ते अपंग होते. बारीक आणि कमकुवत पायांमुळे त्यांना फार दूरपर्यंत चालताही येत नव्हते. (1 एप्रिल 1911) पंजाबमधील जालंधरमधील बियास गावात जन्मलेले फौजा सिंग हे शेतकरी कुटुंबातील चार मुलांपैकी सर्वात लहान होते. पण जेंव्हा ते धावपटू झाले तेव्हा जग त्यांना ओळखू लागले. त्यांना टर्बन टोरनॅडो, रनिंग बाबा आणि शीख सुपरमॅन अशा नावांनी ओळखले जात असे. प्रसिद्ध दिवंगत लेखक खुशवंत सिंग यांनी त्याच्यावर टर्बन टॉर्नाडो नावाचे पुस्तक लिहिले होते.

फौजा सिंग यांनी 1999 मध्ये 89 वर्षांच्या वयात धर्मादाय संस्थेसाठी मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लंडन, टोरंटो आणि न्यू यॉर्कमध्ये नऊ वेळा 26 मैलांची पूर्ण मॅरेथॉन पूर्ण केली आहे. टोरंटोमध्ये त्यांनी 5 तास 40 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. वयाच्या 101 व्या वर्षी जगातील सर्वात वयस्कर धावपटू फौजा सिंग यांनी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली.

हाँगकाँगमध्ये झालेली मॅरेथॉन ही त्याच्या आयुष्यातील शेवटची शर्यत होती. फौजा येथे कोणतेही पदक जिंकू शकले नाहीत, परंतु नेहमीप्रमाणे त्याने ही शर्यत पूर्ण केली. त्याने त्याची 10 किमीची शेवटची शर्यत 1 तास 32 मिनिटे आणि 28  सेकंदात पूर्ण केली. 16 ऑक्टोबर 2011 ते 8 तास, 11 मिनिटे आणि 6 सेकंदात टोरंटो मॅरेथॉन पूर्ण करून जगातील पहिला 100 वर्षांचे धावपटू बनले. परंतु जन्म प्रमाणपत्राअभावी त्याचा विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदवता आला नाही.

फौजा सिंग जुलै 2012 मध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये ऑलिंपिक टॉर्च घेऊन धावले होते. 2015 मध्ये त्यांना ब्रिटिश एम्पायर मेडल देण्यात आले. त्यांच्या फिटनेसबद्दल, फौजा सिंग म्हणायचे की, मी प्रत्येक परिस्थितीत नेहमीच आनंदी असतो आणि दररोज पंजाबी पिन्नी खातो. पिन्नी खाल्ल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध आणि मी प्रत्येक ऋतूत माझ्या जेवणात दही नक्कीच घेतो. हे माझ्या आरोग्याचे सर्वात मोठे रहस्य आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्टीलच्या डब्यात चुकूनही हे 5 पदार्थ ठेवू नका, आरोग्य येईल धोक्यात स्टीलच्या डब्यात चुकूनही हे 5 पदार्थ ठेवू नका, आरोग्य येईल धोक्यात
स्टीलचे डबे हे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात एक सामान्य वस्तू आहे. ही भांडी टिकाऊ असतात शिवाय स्वच्छ करण्यास सोपे असतात. आणि घरात...
ही ६ कारणं वाढवत आहेत तुमचं वजन,वेट लॉस करायचंय तर वेळीच लक्ष द्या
मुसळधार पावसाने मांदिवली पूल पाण्याखाली; पुरामुळे पुलावरील वाहतूक ठप्प
चाकरमान्यांसाठी खुषखबर, गणेशोत्सव काळात राज्य सरकार कोकणात चालवणार पाच हजार बसेस
Health Tips – ‘हे’ फळ आहे कॅन्सरचा कर्दनकाळ, तुमच्या आहारात या फळाचा समावेश हवाच
Ratnagiri Rain News – संगमेश्वर तालुक्यात पावसाने दाणादाण, रामपेठ बाजारपेठेत पूरस्थिती; कसबा, डिंगणी, संगमेश्वर- देवरुख मार्ग बंद
हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले