मुंबई-गोवा महामार्गावर उलटलेल्या टॅंकरमधील वायु काढण्याचे काम सुरू; 9 तास वाहतूक ठप्प
मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास गॅस टँकर उलटला. वायुगळतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक गेल्या 9 तासांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
सध्या अपघातस्थळी गॅस टँकरमधील वायु रिकामा करण्यासाठी रेस्क्यू व्हॅन आणि दुसरा टँकर दाखल झाला आहे. गॅस रिकामा करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर उलटलेला टँकर बाजूला करण्याचं काम हाती घेण्यात येईल. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली असून, हलक्या वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे. महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
टॅंकरमधून वायुगळती होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.तयेच महामार्गावरील वाहतूकीचा मार्ग बंद करण्यात आल्याने महामार्गावर गाड्यांची रांग लागली आहे.छोट्या वाहनांसाठी वळके ते बावनदी हा मार्ग सुरू करण्यात आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर LPG गॅस वाहून नेणारा टँकर पलटी, हायवेवरील वाहतूक ठप्प
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List