सैनिकी अभियानाचे राजकारण करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्र्यावर कोर्ट मार्शलची कारवाई झालीच पाहिजे; संजय राऊत यांनी ठणकावले
ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव हे मते मिळवण्यासाठी केले काय, सैनिकांच्या अभियानाचे राजकारण करणाऱ्या भाजपने आपल्या विचारांची खालची पातळी दाखवून दिली आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. तसेच टेटर आणि क्रिकेट एकत्र येणे, हे भाजपला चालते का, असा परखड सवालही त्यांनी केला आहे.
उरी, पठाणकोट, पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यात अनेक निरपराधांचे बळी गेले आहेत. हा अपराध सरकारने केला आहे. या सरकारने आपल्या सैनिकांच्या कारवाईचे, अभियानाचे आणि शौर्याचे राजकारण केले आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांवर कोर्ट मार्शलची कारवाईच झाली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. सरकार ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव, ऑपरेशन गंगा, ऑपरेशन यमुना हेच करणार आहे काय? सरकारने ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन पोलो, ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन विजय यांची आठवण ठेवावी, असेही त्यांनी ठणकावले.
सैनिकांच्या कारवाईत जाती- धर्म नसतो. मात्र, आता भाजप सैनिकांच्या शौर्याचेही राजकारण करत आहे. या अभियानात हिंदुत्व आणत आहेत. यात कोठेही धर्म येत नाही. ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन पोलो, ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन विजय या नावांचा भाजपला द्वेष आहे काय, असा सवालही त्यांनी केला. यातून त्यांची विचारांची खालची पातळी दिसून येत आहे. सैन्य दलाच्या पराक्रमातही ते राजकारण करत जात-धर्म आणत आहेत. ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव हे सर्व भाजप मतांसाठी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List