माझ्या कुटुंबाची अजूनही रेकी केली जात आहे, पोलिसांचा व्हिडीओ शेअर करत एकनाथ खडसे यांचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कुटुंबाची रेकी केली जात असल्याचा आरोप सोशल मीडियावरून केला आहे. खडसे यांनी ट्विटरवरून दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. त्या व्हिडीओत काही साध्या वेषातील पोलीस हे त्यांची मुलगी व राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या घराबाहेर उभे असल्याचे दिसत आहेत. त्या व्हिडीओसोबत एक पोस्ट शेअर करत खडसे यांनी त्यांच्या घराची रेकी केली जात असल्याचा आरोप केला आहे.
”आज माझ्या मुलीच्या पुण्यातील राहत्या घरी मी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला काही अनोळखी लोक शिरले असल्याचे पत्रकार बांधवांनी माझ्या निदर्शनास आणून दिले. या माणसांना आम्ही जाब विचारला तर त्यांनी पोलीस कर्मचारी असल्याचे सांगितले. तब्बल 10-12 लोक ? (हेडकॉन्स्टेबल दिपक कांबळे, चंद्रकांत रेजीतवाड, पोलीस इन्स्पेक्टर विक्रम गौर अशी काहींची नावे आहेत) या लोकांनी कोणते तरी जगदाळे म्हणून अधिकारी आहेत त्यांना फोन जोडून दिला तर या जगदाळेंनी कबूल केले की त्यांनीच ही माणसं पाठवली. हे जगदाळे कोण ? त्यांची ही माणसं माझ्या मुलीच्या घरात अशीच कशी शिरतात ? त्यांना कुणी परवानगी दिली ? या लोकांचा हेतू काय ? या जगदाळेंचा बॉस कोण आहे ? कुणाच्या इशाऱ्यावर ही माणसं पाठवली गेली होती ? याचे उत्तर आम्हाला हवे आहे, असे खडसे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
”माझ्या कुटुंबाची अजूनही रेकी केली जात आहे. माझ्या कुटुंबाविरोधात कुणाला आणखी एखादं कुभांड रचत आहे का ? असा प्रश्न मला पडतो आहे. माझ्या 35-40 वर्षांच्या संसदीय कारकीर्देत मी इतक्या खालच्या पातळीचे राजकारण पाहिले नाही”, असेही खडसे या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
आज माझ्या मुलीच्या पुण्यातील राहत्या घरी मी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला काही अनोळखी लोक शिरले असल्याचे पत्रकार बांधवांनी माझ्या निदर्शनास आणून दिले.
या माणसांना आम्ही जाब विचारला तर त्यांनी पोलीस कर्मचारी असल्याचे सांगितले. तब्बल १०-१२ लोक ?(हेडकॉन्स्टेबल दिपक… pic.twitter.com/0w1i24WCpC
— Eknath Khadse (@EknathGKhadse) July 29, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List