झारखंडच्या देवघरमध्ये कावडियांना भरलेल्या बसची ट्रकला धडक; 18 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

झारखंडच्या देवघरमध्ये कावडियांना भरलेल्या बसची ट्रकला धडक; 18 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

झारखंडमधील देवघर येथे कावडियांना घेऊन जाणाऱ्या बसने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहे. श्रावण महिना सुरू असल्याने उत्तर हिंदुस्थानात ठिकठिकाणी कावड यात्रा काढण्यात येतात. यात भाविक गंगाजल किंवा पवित्र नद्यांचे पाणी शिवपिंडींवर अर्पण करण्यासाठी यात्रा करतात.

हा अपघात मंगळवारी सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास गोड्डा-देवघर मुख्य रस्त्यावर झाला. जमुनिया वळणाजवळ कावडियांनी भरलेली बस आणि ट्रकची धडक झाली. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य हाती घेतले. घटनेची मिळताच मोहनपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रियरंजन यांच्यासह पोलीस पथक पोहोचले आणि त्यांना वाचवले. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेद्वारे मोहनपूर सीएचसी येथे पाठवण्यात आले.

स्थानिकांनी सांगितले की,अपघातात 20 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की बसचे तुकडे तुकडे झाले. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, आज सकाळी देवघरच्या मोहनपूर ब्लॉकमधील जमुनिया चौकजवळ झालेल्या बस अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या भाविकांच्या मृत्यूची अतिशय दुःखद बातमी मिळाली आहे. जिल्हा प्रशासन मदत आणि बचाव कार्यासह जखमींना वैद्यकीय सुविधा पुरवत आहे. बाबा बैद्यनाथ, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या आत्म्यास शांती द्या आणि शोकग्रस्त कुटुंबांना या दुःखाच्या वेळी सहन करण्याची शक्ती द्या, असे त्यांनी म्हटले आहे.

देवघर, ज्याला बैद्यनाथ धाम असेही म्हणतात. दरवर्षी, श्रावण महिन्यात, लाखो भाविक येथे भगवान शिवाची पूजा करण्यासाठी आणि पवित्र गंगाजल अर्पण करण्यासाठी येतात. देवघर हे देवांचे निवासस्थान मानले जाते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;